
ऑलिम्पिक खेळाडू मनु भाकर हिने भारतासाठी ब्राँझ पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तिने जिंकलेल्या पदकामुळे संपूर्ण देशात उत्साह निर्माण झाला असून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल कुंबळे या सर्वांनीच तिचे अभिनंदन केले आहे. रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार, युवा आणि खेळ मंत्री रक्षा खडसे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी अभिनंदन केलेल्या ट्विटला मनू भाकरने रिट्विट करून आभार व्यक्त केले आहे.
मनू भाकरने केले आभार व्यक्त -
मनू भाकरने यावेळी सर्वच स्तरातील सेलिब्रेटी, राजकीय व्यक्ती आणि खेळाडू यांचे आभार व्यक्त केले आहे. तिचे अभिनंदन महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि रक्षा खडसे या दोघांच्याकडून करण्यात आले. यावेळी तिने दोघांचे आभार व्यक्त केले आहेत. रक्षा खडसे या ट्विटमध्ये लिहितात की, मनू भाकरद्वारे अभूतपूर्व कामगिरी. तिने Paris Olympics 2024 मध्ये भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला बनून उल्लेखनीय कामगिरीसह भारताचे पदक खाते उघडले. अशा प्रकारे रक्षा खडसे यांनी अभिनंदन केले आहे.
मनू भाकरचे कोणी केले अभिनंदन? -
मनू भाकरचे यावेळी विविध स्तरांमधून अभिनंदन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनूला कॉल करून सर्वात आधी तिचे अभिनंदन केले. त्यांनी अभिनंदन केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला दिसून आला. त्यानंतर अनिल कुंबळे, रक्षा खडसे, अमित शहा, जे पी नड्डा, किरण रिजिजू यांनी मनूचे अभिनंदन केले.