US : “भारताशी संबंध बिघडवू नयेत", टॅरिफ धमकीवर निक्की हेली यांची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तंबी

Published : Aug 06, 2025, 09:35 AM IST
nikki haley

सार

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी असे म्हटले की, भारत हा चांगला व्यापारी भागीदार राहिलेला नाही आणि ते पुढील २४ तासांत भारतावर आयात शुल्क (टॅरिफ) वाढवतील, अशा वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निक्की हेली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई :  रिपब्लिकन पक्षाच्या भारतवंशी नेत्या निक्की हेली (Nikki Haley) यांनी मंगळवारी सांगितले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध बिघडवू नयेत आणि चीनला सूट देऊ नये. ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या टॅरिफ आणि रशियन तेल खरेदीबाबतच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली.

एक्स (Twitter) वरील पोस्टमध्ये हेली म्हणाल्या की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये. मात्र चीन जो अमेरिका विरोधी देश आहे आणि रशियन व इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे  त्याला मात्र 90 दिवसांची टॅरिफ सूट देण्यात आली आहे.

 

 

चीनला सूट देऊ नका

हेली पुढे म्हणाल्या, “चीनला सूट देऊ नये आणि भारतासारख्या मजबूत सहयोगी देशाशी संबंध बिघडवू नयेत.” दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर असलेल्या हेली या ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत होत्या आणि त्या कॅबिनेट दर्जावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतवंशी महिला आहेत.

ट्रम्प भारतावर टॅरिफ वाढवण्याच्या तयारीत

निक्की हेली यांनी अधिकृतपणे 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती, पण गेल्या वर्षी मार्चमध्ये त्या निवडणूक रेसमधून बाहेर पडल्या. ट्रम्प यांच्या भारतावर टॅरिफ वाढवण्याच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हेली यांचे हे वक्तव्य आले आहे.

चीनला 90 दिवसांची टॅरिफ सूट मिळाली, भारताला नाही

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केल्यामुळे ते भारतावर लवकरच टॅरिफ वाढवतील. पण त्याचवेळी चीन, जो रशियन आणि इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, त्याला मात्र 90 दिवसांची टॅरिफ सूट देण्यात आली आहे. यावर निक्की हेली यांनी तीव्र टीका केली.

भारताला लक्ष्य करणं अनुचित – भारत सरकार

ट्रम्प यांच्या या विधानानंतर भारत सरकारने प्रतिक्रिया दिली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “भारताला लक्ष्य करणं चुकीचं आहे. सरकार आपल्या राष्ट्रीय हितसांठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.”

PREV
Read more Articles on

Recommended Stories

टॉयलेटमध्ये धूम्रपान केल्यास काच होईल पारदर्शक, चीनने लढवली अनोखी शक्कल!
कॅनडात भारतीय PhD च्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण!