
मुंबई : नेपाळमध्ये एका उंचावरील हेलिपॅडवर लँडिंग करत असताना दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक बसली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी 'एक्स' (X) वर दिली आहे.
राजधानी काठमांडूपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलुखुंबू येथील हेलिपोर्टवर हा अपघात झाला. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ दोन हेलिकॉप्टरची धडक; एका परदेशी नागरिकाचा मृत्यू
आज सकाळचे भयानक दृश्य.
नेपाळच्या एव्हरेस्ट भागातील फेरिचे येथे लँडिंग करताना 'फिशटेल एअर' आणि 'एअर डायनेस्टी'च्या दोन हेलिकॉप्टरची धडक झाली.
यात एका परदेशी प्रवाशाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. हा अपघात सकाळी ८:१५ च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) झाला.
अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.
— सुबोध कुमार (@kumarsubodh_) ३ नोव्हेंबर २०२६