मॉस्कोवर एकाच वेळी युक्रेनच्या 11 ड्रोन्सचा हल्ला, चारही आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तास बंद!

Published : Feb 23, 2026, 07:45 AM IST
Moscow Airports shut After Russia Downs Multiple Ukrainian Drones

सार

Moscow Airports shut After Russia Downs Multiple Ukrainian Drones : युक्रेनने एकाच दिवसात ७१ ड्रोन हल्ले केल्याचा दावा रशियाने केला आहे. मॉस्कोला लक्ष्य करणाऱ्या ११ ड्रोन्ससह सर्व ड्रोन पाडल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.

Moscow Airports shut After Russia Downs Multiple Ukrainian Drones : रशियाची राजधानी मॉस्कोमधील चारही आंतरराष्ट्रीय विमानतळं काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली. युक्रेनने मॉस्कोच्या दिशेने पाठवलेले ११ ड्रोन्स रशियन हवाई संरक्षण दलाने पाडल्यानंतर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. रशियाची हवाई वाहतूक एजन्सी 'रोसावियात्सिया' (Rosaviatsiya) ने एक पत्रक काढून सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळं बंद ठेवत असल्याचं जाहीर केलं होतं.

डोमोडेडोवो, व्नुकोवो, झुकोव्स्की आणि शेरेमेट्येवो या चार आंतरराष्ट्रीय विमानतळांचा यात समावेश होता. ड्रोन हल्ल्याचा धोका टळल्यानंतर काही तासांनी विमानतळांवरील कामकाज पुन्हा सामान्य झालं.

आज दिवसभरात ७१ ड्रोन्स पाडले

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबियानिन यांनी सांगितलं की, "युक्रेनने शहराच्या चार प्रमुख विमानतळांना लक्ष्य करत ११ ड्रोन्स पाठवले होते, पण ते सर्व पाडण्यात आले. एका तासाच्या आत हे सर्व हल्ले झाले."

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, युक्रेनने आज दिवसभरात एकूण ७१ ड्रोन्स रशियाच्या दिशेने पाठवले आणि ते सर्व हवाई संरक्षण प्रणालीने निकामी केले. युक्रेनवरील रशियन आक्रमणाला चार वर्ष पूर्ण होण्याच्या दोन दिवस आधी हा मोठा हल्ला झाला आहे, हे विशेष.

या हल्ल्यात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. ड्रोनच्या अवशेषांमुळे इमारतींचं काही नुकसान झालं आहे का, याची तपासणी सुरू असल्याचं रशियाने म्हटलं आहे. युद्धाच्या चौथ्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून मॉस्को आणि इतर शहरांवर सातत्याने ड्रोन हल्ले होत असल्याचा आरोप रशिया करत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

US Iran Conflict : अमेरिकेची इराणला घेरण्याची तयारी, मध्य पूर्वेत लष्करी हालचालींना वेग!
US Assassination Plot : खामेनी आणि त्यांच्या मुलाच्या हत्येचा ट्रम्प यांचा 'सिक्रेट प्लॅन'? इराणवर हल्ल्याचीही तयारी!