US Assassination Plot : खामेनी आणि त्यांच्या मुलाच्या हत्येचा ट्रम्प यांचा 'सिक्रेट प्लॅन'? इराणवर हल्ल्याचीही तयारी!

Published : Feb 22, 2026, 09:36 AM IST
US Assassination Plot

सार

US Assassination Plot : इराणने अणुबॉम्बसाठी आवश्यक युरेनियम समृद्धीकरण थांबवलं नाही, तर अमेरिका मर्यादित हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अयातुल्ला अली खामेनी आणि त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्या हत्येचाही प्लॅन आखल्याचं समोर आलं आहे.

US Assassination Plot : इराणवर मर्यादित हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर आता एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुप्त योजनांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांच्या हत्येचाही समावेश होता, असं एका वृत्तात म्हटलं आहे.

अमेरिकेने इराणला लष्करी वापरासाठी आवश्यक युरेनियम समृद्धीकरण थांबवण्यास सांगितलं आहे. यावर इराणने अमेरिकेशी करार करावा, असा दबावही टाकला जात आहे. पण इराण हे मान्य करत नसल्याने, ट्रम्प यांनी त्या देशावर मर्यादित हल्ल्याची योजना आखली आहे. यासोबतच, अयातुल्ला अली खामेनी आणि त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची हत्या करण्यासह अनेक लष्करी पर्याय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आहेत. ते कोणत्याही क्षणी निर्णय घेऊ शकतात,' असं अमेरिकेच्या 'ॲक्सिऑस' (Axios) या वृत्तसंस्थेने ट्रम्प यांच्या एका सल्लागाराच्या हवाल्याने म्हटलं आहे.

"ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेत खामेनी, त्यांचे संभाव्य उत्तराधिकारी असलेले त्यांचे पुत्र आणि इतर मुल्लांना सत्तेतून बाहेर काढण्याचाही एक पर्याय होता. पण अध्यक्षांनी हल्ल्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. कदाचित ते हल्ला करणार नाहीत. पण असंही होऊ शकतं की, ते उद्या सकाळी उठून 'हल्ला करा' असा आदेश देतील,' असं ट्रम्प यांच्या एका वरिष्ठ सल्लागाराने सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Turkey Kitten Rescue: मांजराच्या पिल्लाला वाचवताना तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
Brazil Train Accident: ब्राझीलमध्ये रेल्वे रुळावर पडलेल्या क्रेनला ट्रेनची धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ