Viral Video: गर्लफ्रेंडसाठी ६ लाखांची अंगठी, ऑफिस सुटल्यावर करायचा डिलिव्हरीचं काम; तरुणाची लव्हस्टोरी व्हायरल

vivek panmand   | CMS
Published : Aug 08, 2026, 05:34 PM IST
Viral Video: गर्लफ्रेंडसाठी ६ लाखांची अंगठी, ऑफिस सुटल्यावर करायचा डिलिव्हरीचं काम; तरुणाची लव्हस्टोरी व्हायरल

सार

एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या स्वप्नातली अंगठी देण्यासाठी तब्बल आठ महिने डबल शिफ्टमध्ये काम केलं. तो दिवसभर कॉर्पोरेट नोकरी करायचा आणि रात्री फूड डिलिव्हरी. ब्रॅडली चो नावाच्या या तरुणाने ६,५०० डॉलर्स (सुमारे ६ लाख रुपये) जमवून अखेर ती अंगठी खरेदी केली. त्याची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

प्रेमासाठी लोक काय काय करतात, याचे अनेक किस्से आपण ऐकतो. पण एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसाठी जे केलं, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या स्वप्नातली एंगेजमेंट रिंग देण्यासाठी तब्बल आठ महिने डबल शिफ्टमध्ये काम केलं. तो दिवसभर ऑफिसमध्ये नोकरी करायचा आणि रात्री उशिरापर्यंत फूड डिलिव्हरीचं काम करायचा. अखेर जेव्हा त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी ती खास अंगठी हातात घेतली, तेव्हा त्याचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.

ब्रॅडली चो असं या तरुणाचं नाव असून, त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो, "आज ८९ वा दिवस आहे, जोपर्यंत मी माझ्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी अंगठी विकत घेऊ शकत नाही." त्याच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास, असे अनेक व्हिडिओ दिसतात ज्यात तो रोज पैसे जमवण्यासाठी करत असलेली धडपड दाखवतो. त्याने एका व्हिडिओत सांगितलं की, गर्लफ्रेंडच्या 'ड्रीम रिंग'साठी त्याने ६,५०० डॉलर्स (सुमारे ६ लाख रुपये) यशस्वीरित्या जमवले आहेत. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता, असंही तो सांगतो.

तो सांगतो की, रोज कॉर्पोरेट नोकरीनंतर तो रात्री फूड डिलिव्हरी करायचा (अगदी आपल्याकडे जसं झोमॅटो/स्विगीचं काम असतं तसं). त्यानंतर घरी येऊन व्हिडिओ शूट करणे, ते एडिट करणे आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करणे, हे त्याचं रुटीन होतं. जवळपास आठ महिने तो रात्री २ वाजता झोपायचा आणि सकाळी ६ वाजता उठायचा. या काळात तो दोन आठवडे आजारीही पडला. इतकंच नाही, तर त्याच्या बॉसने त्याचा एक व्हिडिओ पाहिल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली होती.

पण आता जेव्हा त्याच्याकडे गर्लफ्रेंडला 'खऱ्या अर्थाने लायक' असलेली अंगठी घेण्यासाठी पैसे जमले आहेत, तेव्हा या सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटतंय, असं ब्रॅडली म्हणतो.

पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तो 'Wedding Bands & Co.' या दुकानातून ती खास अंगठी घेताना दिसतो. ही अंगठी कुरोश (Koorosh) आणि त्यांच्या टीमने तयार केली होती. ब्रॅडलीने सांगितलं की, त्याने लॅबमध्ये तयार केलेला डायमंड निवडला, ज्यात त्यांच्या दोघांच्या बर्थस्टोनचा (birthstones) वापर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी ब्रॅडलीच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे आणि त्याला प्रपोजलचा व्हिडिओही पोस्ट करण्याची विनंती केली आहे. अनेकांनी त्याच्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Egg Flipping: अंडं तव्यावर नाही, थेट ग्राहकाच्या कपाळावर! मुलीचा 'एग-फ्लिप' करतानाचा प्रयत्न फसला, VIDEO VIRAL
Lottery Winner : 10.9 कोटींची लॉटरी फेकली कचऱ्यात, पुढे जे घडलं ते वाचून थक्क व्हाल