दिल्लीनंतर इस्लामाबादमध्ये धमाका, न्यायालयाबाहेर झालेल्या भीषण स्फोटात 12 ठार, अनेक जखमी

Published : Nov 11, 2025, 03:31 PM IST
Major Car Bomb Blast Outside Islamabad Court

सार

Major Car Bomb Blast Outside Islamabad Court : स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

Major Car Bomb Blast Outside Islamabad Court : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील स्थानिक न्यायालयाबाहेर भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत १२ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींपैकी बहुतेक जण न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. वाहनातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यता स्थानिक माध्यमांनी वर्तवली असली तरी, पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी १२.३० च्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज सहा किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या आत्मघाती स्फोटाचा तीव्र निषेध केला असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!