Leandro Paredes: मेसीपाठोपाठ अर्जेंटिनाचा आणखी एक स्टार खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला...

vivek panmand   | CMS
Published : Sep 02, 2026, 09:35 PM IST
football

सार

लिओनेल मेसीच्या निवृत्तीनंतर आता लिआंड्रो परेडेसही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. मेसीशिवाय संघात खेळणं पूर्वीसारखं नसेल, असं त्याने म्हटलं आहे.

ब्यूनस आयर्स: लिओनेल मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, आता अर्जेंटिनाचा आणखी एक स्टार खेळाडू लिआंड्रो परेडेस (Leandro Paredes) सुद्धा निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर झालेल्या वादावादीमुळे सध्या १० सामन्यांच्या बंदीचा सामना करणारा परेडेस आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये परतणार नाही, असं चित्र आहे. बोका ज्युनियर्सकडून खेळणारा ३२ वर्षीय परेडेस निवृत्तीचा गांभीर्याने विचार करत असल्याचं त्याने मीडियाला सांगितलं.

परेडेस म्हणाला की, त्याने अजून प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्याशी चर्चा केलेली नाही, पण मेसीशिवाय गोष्टी पूर्वीसारख्या राहणार नाहीत. "राष्ट्रीय संघात खेळत राहणं आता अवघड वाटतंय. प्रशिक्षकांशी बोलूनच अंतिम निर्णय घेईन," असं परेडेसने स्पष्ट केलं.

लिओनेल मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर लगेचच परेडेसने ही प्रतिक्रिया दिली आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर मैदानावर झालेल्या वादात परेडेसचा सहभाग होता. याच कारणामुळे फिफाने (FIFA) त्याच्यावर १० सामन्यांची बंदी आणि मोठा दंड ठोठावला होता. स्पेनचे खेळाडू गावी (Gavi) आणि एरिक गार्सिया (Eric Garcia) यांच्याशी झालेल्या बाचाबाचीमुळे परेडेसला हा फटका बसला.

दरम्यान, कॅप्टन लिओनेल मेसीशिवाय अर्जेंटिनाचा संघ आता एका नव्या युगात प्रवेश करत आहे. मेसीच्या अनुपस्थितीत प्रशिक्षक स्कालोनी यांना संघात मोठे बदल करावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय युवा खेळाडू निको पाझ (Nico Paz) आता अर्जेंटिनाच्या मिडफिल्डमध्ये मेसीची जागा घेईल आणि महत्त्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kim Jong Un Dead : किम जोंग उनचा मृत्यू? प्योंगयांगमध्ये ९००० चिनी सैनिक, अफवांना उधाण
सीमा बंद करा, नाहीतर युरोप उद्ध्वस्त होईल; ट्रम्प यांचा फ्रान्सला इशारा