Italy Protests: इटलीत महागाईचा भडका; लोक रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक! मेलोनींविरोधात घोषणाबाजी

vivek panmand   | CMS
Published : Oct 18, 2026, 07:28 PM IST
Italy Protests: इटलीत महागाईचा भडका; लोक रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक! मेलोनींविरोधात घोषणाबाजी

सार

इटलीमध्ये वाढत्या महागाईविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. मिलान आणि बोलोग्ना शहरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. महागाई आणि कमी पगार या मुद्द्यांवरून झालेल्या या हिंसक घटनांचा पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी कडक शब्दांत निषेध केलाय.

वाढत्या महागाईमुळे इटलीत सुरू असलेल्या आंदोलनांनी आता हिंसक रूप घेतलंय. मिलान आणि बोलोग्ना यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आलेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मिलानमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तर बोलोग्नामध्ये पाण्याचा मारा (वॉटर कॅनन) करण्यात आला. या झटापटीत अनेक जण जखमी झाले असून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलंय. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या हिंसक घटनांचा तीव्र निषेध केलाय.

दुकाने लुटली, जाळपोळ सुरू

शनिवारी मिलानमधील प्रसिद्ध गॉथिक कॅथेड्रलसमोरील 'पियाझा ड्युओमो' (Piazza Duomo) परिसरात हा राडा सुरू झाला. आंदोलकांनी पोलिसांवर दगड आणि इतर वस्तू भिरकावल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. फ्रान्समध्ये झालेल्या आंदोलनांप्रमाणेच इटलीतही चेहरे झाकलेले आंदोलक आघाडीवर आहेत. 'गॅलेरिया विटोरिओ इमॅन्युएल II' या आलिशान शॉपिंग सेंटरमधून आंदोलकांना बाहेर काढताना दंगल नियंत्रण पथकाच्या नाकीनऊ आले.

अश्रुधूर आणि पाण्याचा मारा

या वाढत्या तणावामुळे प्रमुख शहरांमधील दुकानांचे शटर डाऊन झालेत. पर्यटकांनीही या भागातून काढता पाय घेतलाय. शहरातील ड्युओमो मेट्रो स्टेशन तात्पुरतं बंद करण्यात आलंय. इटालियन मीडियाच्या रिपोर्टनुसार, या घटनेत अनेक जण जखमी झाले असून काहींना अटक करण्यात आलीय. बोलोग्नामध्ये आंदोलन हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला. 'ANSA' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तिथे सात जणांना अटक करण्यात आलीय. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील मुख्य रेल्वे स्टेशनही बंद ठेवण्यात आल्याची माहिती मेलोनी यांनी दिली.

जनता महागाईने त्रस्त

वाढती महागाई, कमी पगार, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि सरकारी शाळांची दुरवस्था यामुळे संतापलेले लोक रस्त्यावर उतरलेत. एकट्या मिलानमध्ये पाच हजारांहून अधिक लोकांनी या रॅलीत सहभाग घेतल्याचं बोललं जातंय. दरम्यान, शांततेत आंदोलन करण्याच्या अधिकाराला आपला पाठिंबा असल्याचं मेलोनी यांनी स्पष्ट केलंय, पण हिंसाचार आणि तोडफोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. विरोधी पक्षांनीही या हिंसक घटनांचा स्पष्ट शब्दांत निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केलीय. शेजारील फ्रान्समध्ये वाढती महागाई आणि ढासळत्या शिक्षण व्यवस्थेविरोधात झालेल्या आंदोलनांनंतर आता इटलीतही जनतेचा उद्रेक पाहायला मिळतोय.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI Girlfriend: प्रेमासाठी घरदार विकून १२०० मैल प्रवास, पण ती निघाली AI!
Artificial Intelligence: एआयमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था ४४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचणार, जॅक क्लार्क यांचा दावा