Israel: इस्रायलमध्ये बेकरीबाहेर भयंकर हल्ला, ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू आणि तिघे जखमी

vivek panmand   | CMS
Published : Nov 18, 2026, 08:16 PM IST
photo

सार

उत्तर इस्रायलमधील काफर मंडा येथील एका बेकरीबाहेर गाडीखाली चिरडून आणि ग्रेनेड हल्ला करून एका ५१ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तिच्या पतीसह अन्य तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी हा प्रकार गुन्हेगारी टोळीच्या वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला असून, चार संशयितांना अटक केली आहे.

उत्तर इस्रायलमध्ये १४ नोव्हेंबरला एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. काफर मंडा या अरब बहुल शहरातील एका बेकरीबाहेर ५१ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी प्रथम तिला गाडीची धडक दिली आणि नंतर तिथेच ग्रेनेड फेकले.

सोशल मीडियावर, विशेषत: X (पूर्वीचे ट्विटर) वर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, महिला बेकरीतून बाहेर पडत असताना एका वेगात जाणाऱ्या कारने तिला धडक दिली. त्यानंतर गाडीतील लोकांनी तिथे ग्रेनेड फेकला, ज्याचा काही क्षणांतच स्फोट झाला. या स्फोटात ती गंभीर जखमी झाली.

या महिलेसोबतच तिच्या पतीलाही हल्लेखोरांनी गाडीखाली चिरडले. या स्फोटात एकूण तिघे जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

काफर मंडामध्ये नक्की काय घडलं?

उत्तर इस्रायलच्या गॅलिली परिसरातील काफर मंडा शहर १४ नोव्हेंबरच्या या भीषण घटनेमुळे चर्चेत आले. दलियात अल-कार्मेल येथे राहणाऱ्या ५१ वर्षीय लीना कासेम झिदान या महिलेचा या हल्ल्यात मृत्यू झाला. बेकरीबाहेर गाडीने दिलेली धडक आणि त्यानंतर झालेला ग्रेनेड स्फोट यामुळे तिचा जीव गेला.

Ynet Global ने दिलेल्या माहितीनुसार, ५ मुलांची आई असलेल्या लीना, आपल्या नातीच्या दुसऱ्या वाढदिवसासाठी केक आणायला पतीसोबत बेकरीत गेल्या होत्या. पण केक घेऊन बेकरीतून बाहेर पडताना काही क्षणांतच त्यांचे आयुष्य संपले.

CCTV फुटेजमध्ये दिसत आहे की, लीना बेकरीतून बाहेर येत असताना एका कारने त्यांना कट मारला आणि गाडीतील प्रवाशाने बेकरीसमोर ग्रेनेड फेकला. ग्रेनेडचा स्फोट होण्याआधीच हल्लेखोर पसार झाले, आणि पळताना त्यांनी लीना यांच्या पतीलाही उडवले.

लीना आणि त्यांच्या पतीला रामबम मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. लीना यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीवर अद्याप उपचार सुरू आहेत.

या घटनेत दोन अन्य नागरिकही जखमी झाले - एक ५६ वर्षीय महिला आणि एक १५ वर्षांची मुलगी. फुरेदीस येथील ५६ वर्षीय अफीफ सामी यांना स्फोटाचे छर्रे लागल्याने त्यांनाही उपचारासाठी हाइफा येथील रुग्णालयात नेण्यात आले.

गुन्हेगारी टोळीच्या वैमनस्याचा पोलिसांना संशय

लीना आणि त्यांचे दिव्यांग पती या हल्ल्याचे मूळ लक्ष्य नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. बेकरी मालकाच्या नातेवाईकाचे एका गुन्हेगारी टोळीसोबत काही वैमनस्य सुरू होते, आणि हा हल्ला त्याच वादातून झाल्याचे मानले जात आहे.

इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्लेखोर एका विशिष्ट व्यक्तीला शोधत आले होते. पण ती व्यक्ती न सापडल्याने त्यांनी रागाच्या भरात बेकरीला लक्ष्य केले आणि शक्तिशाली ग्रेनेड फेकला. यात दुर्दैवाने लीना यांचा बळी गेला.

The Jerusalem Post च्या अहवालानुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आणि हल्ल्यात वापरलेली गाडीही जप्त केली. हत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

पोलिसांनी अद्याप कारण स्पष्ट केलेले नसले तरी N12 च्या मते, हा हल्ला बेकरी मालकाच्या नातेवाईकाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित आहे. नंतर चौथ्या संशयितालाही अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, The Times of Israel च्या वृत्तानुसार, २०२६ सालापासून इस्रायलमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये बळी पडलेली लीना ही २००वी अरब व्यक्ती असून १४वी महिला आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

GTA 6 Reviews: GTA 6 ला मिळाला उदंड प्रतिसाद, Twitch वर 24 लाखांहून अधिक व्ह्यूअर्स
Finland Tram Incident: 'तिकीट कोण चेक करतंय...', फिनलंडमध्ये तिकीट न काढण्याचा सल्ला देणाऱ्या भारतीयावर टीका