Car Theft: अमेरिकेत भावाच्या गाडीची चारही चाकं चोरीला; चोरांनी चिठ्ठी ठेवून दिला 'हा' सल्ला!

vivek panmand   | CMS
Published : Sep 09, 2026, 04:31 PM IST
Car Theft: अमेरिकेत भावाच्या गाडीची चारही चाकं चोरीला; चोरांनी चिठ्ठी ठेवून दिला 'हा' सल्ला!

सार

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीच्या भावाच्या गाडीची चारही चाकं चोरीला गेली. चोरांनी गाडीजवळ एक चिठ्ठी सोडली, ज्यात त्यांनी इमारतीच्या मॅनेजमेंटलाच सुरक्षेसाठी जबाबदार धरलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अमेरिकेतील गुन्हेगारीवर चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीला तिथल्या गुन्हेगारीचा चांगलाच अनुभव आला आहे. तिच्या भावाच्या गाडीची चक्क चारही चाकं चोरांनी लंपास केली. या घटनेची माहिती X (पूर्वीचं ट्विटर) वर एका युझरने दिली. गाडीची चाकं चोरण्यासोबतच, चोरांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सोडून गाडी मालकाची एकप्रकारे मस्करीच केली आहे.

या चिठ्ठीत लिहिलं होतं की, "गेल्या आठवड्यात 'क्रिस्टल हाऊस'च्या आवारात किमान ३ गाड्यांची तोडफोड झाली. या आठवड्यात किमान ३ गाड्यांची चाकं चोरीला गेली आहेत."

"जोपर्यंत 'क्रिस्टल हाऊस' मॅनेजमेंट पार्किंगमधील गुन्हेगारी गांभीर्याने घेत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. त्यांना हे कळवा," असंही त्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

व्हिडिओमध्ये ती तरुणी सांगते की, तिचा भाऊ सकाळी उठला तेव्हा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीची चारही चाकं गायब होती. हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला असला तरी, एशियानेट न्यूजेबलला या घटनेची स्वतंत्रपणे पडताळणी करता आलेली नाही. कारण, याबाबत कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतंही निवेदन आलेलं नाही. ही चोरी नेमकी कुठे झाली, हेदेखील अजून स्पष्ट झालेलं नाही.

व्हायरल व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी गाडी मालकांना व्हील लॉक आणि पार्किंगसाठी सिक्युरिटी कॅमेरे लावण्याचा सल्ला दिला आहे. काही युझर्सनी म्हटलं आहे की, अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये अशा चोऱ्या ही एक सामान्य समस्या आहे.

एका युझरने कमेंटमध्ये लिहिलं, "अमेरिकेत गुन्हेगारी खूप आहे, म्हणूनच तिथला विमा बाजार तेजीत आहे. पण अशीही काही ठिकाणं आहेत जिथे जवळजवळ गुन्हेगारी नाहीच. तुम्ही कुठे राहता यावर ते अवलंबून आहे."

तर दुसऱ्या एका युझरने गंमतीत लिहिलं, "ही चोरी नव्हती, तर तुम्हाला ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न होता. व्वा, बघा... तिथले चोरही इंग्रजी बोलतात आणि त्यांच्याकडे प्रिंटरही आहे. एवढं सगळं सांगूनही, त्यांनी तुम्हाला तुमची पद्धत सुधारण्याचा इशारा दिला आहे."

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

NVIDIA: ३३ वर्षांची ही कंपनी अचानक सगळीकडे का दिसतेय?
Cockroach Milk: झुरळाचं दूध सुपरफूड? इलॉन मस्क म्हणाला 'किळसवाणं'