Dubai Job : पगार लाखात पण खर्च...; दुबईत नोकरी करण्यापूर्वी हा व्हायरल व्हिडिओ नक्की बघा!

Published : Sep 12, 2026, 12:46 PM IST
Dubai Job : पगार लाखात पण खर्च...; दुबईत नोकरी करण्यापूर्वी हा व्हायरल व्हिडिओ नक्की बघा!

सार

दुबईत राहणाऱ्या श्री शुक्ला नावाच्या भारतीय महिलेने एक सल्ला दिला आहे. जर तुमचा पगार दरमहा ५,००० ते ६,००० दिरहमपेक्षा कमी असेल, तर नोकरीसाठी दुबईत येऊ नका.

मुंबई : चांगली नोकरी आणि भरपूर पैसा कमावण्यासाठी अनेकजण दुबईला जाण्याचं स्वप्न पाहतात. भारतीय रुपयांमध्ये तिथला पगार खूप मोठा वाटतो, पण खरंच तितके पैसे हातात उरतात का? दुबईत राहणाऱ्या श्री शुक्ला नावाच्या एका भारतीय महिलेने तिथल्या खर्चाचं वास्तव एका व्हिडिओतून मांडलं आहे. तिचा सल्ला आहे की, जर तुम्हाला दरमहा ५,००० ते ६,००० दिरहम (म्हणजे अंदाजे १.३० लाख ते १.५० लाख रुपये) पगार मिळत नसेल, तर दुबईत येण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या.

श्री शुक्ला म्हणते, “जर तुम्ही भारतातून येत असाल, तर दुबईत तोपर्यंत येऊ नका जोपर्यंत तुमची कंपनी तुम्हाला महिन्याला ५,००० ते ६,००० दिरहम द्यायला तयार होत नाही. हो, कारण दुबई खूप महाग आहे. काही लोकांना वाटतं की ३,००० दिरहम म्हणजे ७० ते ८० हजार रुपये, हे खूप झाले. पण पैसे दिरहममधून भारतीय रुपयांमध्ये बदलून विचार करू नका, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला दुबईत राहायचं आहे, दुबईत काम करायचं आहे आणि दुबईतच दिरहममध्ये पैसे खर्च करायचे आहेत.”

पाहा व्हायरल व्हिडिओ

शुक्लाने स्पष्ट केलं की फक्त पगाराचा आकडा बघून निर्णय घेऊ नये. अगदी आपल्या मुंबई-पुण्यासारखंच, जिथे पगार जास्त वाटतो पण खर्चही तसाच असतो, तशीच दुबईची परिस्थिती आहे. ऑनलाइन दिसणारी जीवनशैली आणि रोजचा खर्च यात मोठं अंतर असू शकतं.

ज्या लोकांना ३,००० ते ४,००० दिरहमची ऑफर मिळते, त्यांच्याबद्दलही शुक्लाने सांगितलं. तिने सल्ला दिला की पगाराचा आकडा बघण्याऐवजी आधी महिन्याच्या अपेक्षित खर्चाचा हिशोब करावा.

इंटरनेटवरच्या प्रतिक्रिया

अनेक युजर्सनी शुक्लाच्या मताशी सहमती दर्शवली. परदेशात जाण्यापूर्वी तिथल्या राहण्याच्या खर्चाची माहिती घेणं गरजेचं आहे, असं अनेकांनी म्हटलं.एका युझरने लिहिलं, “दुबई खरंच खूप महाग आहे.” दुसऱ्याने म्हटलं, “हा खरंच खूप उपयोगी सल्ला आहे.” एका व्यक्तीने कमेंट केली, “योग्य नियोजन खूप महत्त्वाचं आहे.” तर आणखी एका युझरने लिहिलं, “परदेशात जाण्यापूर्वी नेहमी हिशोब करावा.”

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli : लंडनमध्ये विराट कोहलीची एकनाथ शिंदेंशी भेट, म्हणाला - 'महाराष्ट्रात जबरदस्त विकास होतोय'
Nepal Floods : अमेरिकेत नेपाळ पूरग्रस्तांसाठी प्रार्थना; 'आम्ही चमत्काराची वाट पाहतोय' - खासदार