एक महिला बाजारात सामान खरेदीसाठी गेली होती. तेवढ्या मुसळधार पाऊस आला. तिला आडोसा हवा होता. ती एका दुकानात गेली. तेथून घरी परतली. तोपर्यंत ती कोट्यधीश झाली होती. याची तिला स्वतःलाच कल्पना नव्हती…!
तुम्ही नशीब मानता का? जर नाही मानत तर ही घटना वाचल्यानंतर नक्कीच मानायला लागाल. ही अद्भुत घटना घडली आहे चीनमध्ये. तिथे एक महिला बाजारात सामान खरेदीसाठी गेली होती. पण घरी परतताना ती कोट्यधीश होईल याची तिला स्वतःलाच कल्पना नव्हती.
26
काय झाले हे तिलाच माहीत नव्हते
महिला बाजारात शॉपिंग करत असताना अचानक पाऊस पडायला लागला. पावसापासून वाचण्यासाठी ती एका दुकानात शिरली. ते लॉटरीचे दुकान होते. तिथे तिने वेळ घालवण्यासाठी लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. नंतर काय होईल हे तिलाच माहीत नव्हते.
36
काय आहे ही घटना?
वृत्तानुसार, ८ ऑगस्ट रोजी नैऋत्य चीनमधील युन्नान प्रांतातील युक्सी येथे एक महिला पावसात अडकली. पावसापासून वाचण्यासाठी ती जवळच्या लॉटरीच्या दुकानात गेली. तिथे तिने दुकानदाराकडे "तुमच्याकडे स्क्रॅच कार्ड आहेत का? पाऊस थांबेपर्यंत मी थोडा वेळ खेळते." असं विचारलं.
नंतर काय झालं... त्या महिलेने सुमारे ३० तिकिटांची एक संपूर्ण पुस्तिका विकत घेतली. प्रत्येक तिकिटाची किंमत ३० युआन (सुमारे २५० रुपये) होती. म्हणजेच तिने तिकिटांसाठी एकूण ९०० युआन (सुमारे १२,५०० रुपये) खर्च केले. पण सहावं तिकीट स्क्रॅच करताच नशीब झळकलं. हो, तिने १० लाख युआन (सुमारे १.४ कोटी रुपये किंवा US$ १४०,०००) बक्षीस जिंकलं.
56
'स्वप्नातही पाहिलं नव्हतं...'
बक्षीस जिंकल्यावर ती महिला खूप आश्चर्यचकित झाली, तिचे हातपाय थरथरायला लागले. "असं होईल असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. कदाचित पाऊस खरोखरच समृद्धी आणतो," असं ती म्हणाली.
66
दोन प्रकारच्या लॉटरी
एकूण दोन प्रकारच्या लॉटरी असतात. पहिली दररोज किंवा दर आठवड्याला काढली जाणारी लॉटरी आणि दुसरी स्क्रॅच कार्ड, जी खरेदी करताच तुम्ही काही जिंकला आहात की नाही हे लगेच कळतं.