जर्मनीमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. एका भरधाव वेगाने आलेल्या गाडीने 11 जणांना चिरडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय 80 हून अधिकजण जखमी झाले आहेत.
Germen Christmas Market Attack : जर्मनीमधील मॅगडेबर्गमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. भरधाव वेगाने आलेली एक गाडी ख्रिसमससाठी सजलेल्या मार्केटमध्ये घुसत तेथील नागरिकांना धडकली गेली. या दुर्घटनेत 11 जणांना मृत्यू झाला आहे. जर्मनी पोलिसांनी माहिती देत म्हटले की, कारमधील व्यक्ती सौदी अरब येथे राहणारा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या दुर्घटनेबद्दल अधिक माहिती देत क्षेत्र प्रमुख रेनर हसेलॉफ यांनी माहिती देत म्हटले की, कारमधील व्यक्ती सौदी अरब येथे राहणारा असून त्याचे वय 50 वर्षे आहे. याशिवाय ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती जर्मनीमध्येच गेल्या दोन दशकांपासून राहत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीलाच या दुर्घटनेसाठी दोषी ठरवण्यात आले आहे.
रॉयटर्सच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, कारमध्ये विस्फोटक उपकरण होते असा पोलिसांना संशय होता. पण कारमध्ये तपासणी केली असता काहीही मिळाले नाही. पोलिसांनी दुर्घटनेतील मृतांचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणीही पोलिसांकडून करण्यात आली आहे. खरंतर, ही घटना हल्ल्याच्या दृष्टीकोनातूनही घडली असती असेही बोलले जात आहे.
जर्मन प्रसारक MDR चे प्रवक्ते माइकल रीफ यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, सुरुवातीच्या तपासणीनुसार ख्रिसमससाठी सज्ज झालेल्या मार्केटमध्ये हल्ला झाला होता. यामध्ये काहीजण जखमी आणि मृत्यू झाले. पोलीस पथक आणि रेस्क्यू टीमकडून बचाव कार्य सुरू आहे. या घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शींनी माहिती देत म्हटले की, कार थेट टाउन हॉलच्या दिशेने मार्केटमध्ये घुसली गेली.
जर्मन चान्सलर ओलाफ स्क्लोल्ज यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर करत स्क्लोल्ज यांनी म्हटले की, "माझ्या संवेदना पीडित व्यक्ती आणि त्यांच्या परिवारासोबत आहेत. आम्ही पीडितांसह मॅगडेबर्गमधील नागरिकांसोबत आहोत. या चिंताजनक स्थितीत रेस्क्यू टीम तुमचे आभार. याआधी 8 वर्षांपूर्वीही एक ट्यूनिशामध्ये राहणाऱ्या अनीस अमरी नावाच्या व्यक्तीने बर्लिनमधील ख्रिसमस मार्केटमध्ये ट्रक घुसवला होता. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता."
आणखी वाचा :
जपानच्या स्पेस वनचा कैरोस रॉकेट पुन्हा अयशस्वी
विमानात शौचालयातून गळती, पाणी केबिनमध्ये; प्रवाशांची तारांबळ