इलॉन मस्क नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार? ट्रम्प यांना देणार जोरदार टक्कर

Published : Jun 07, 2025, 12:37 PM ISTUpdated : Jun 07, 2025, 12:45 PM IST
Elon Musk education

सार

एका काळी एकमेकांचे विश्वासू समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात आता राजकीय वाद चिघळले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात मस्क यांना महत्त्वाची भूमिका मिळाली होती.

एका काळी एकमेकांचे विश्वासू समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात आता राजकीय वाद चिघळले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात मस्क यांना महत्त्वाची भूमिका मिळाली होती, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्रम्प सरकारमधून माघार घेतल्याने संबंध बिघडले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर खुलेआम टीका केली असून मैत्री शत्रुत्वात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“माझ्याशिवाय ट्रम्प निवडून आले नसते” – मस्क ट्रम्प प्रशासनाच्या एका नव्या विधेयकावर नाराजी व्यक्त करताना मस्क यांनी मोठं विधान केलं होतं. “माझ्याशिवाय ट्रम्प निवडून आले नसते. डेमोक्रॅट्सना बहुमत मिळालं असतं”. या विधानानंतर अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण आलं. प्रत्युत्तरादाखल ट्रम्प यांनी मस्क यांचे सरकारी करार आणि अनुदान रद्द करण्याची धमकी दिली आणि मस्क यांच्याशी संवादाची इच्छा नसल्याचेही स्पष्ट केलं. त्यांनी मस्क यांच्याबाबत "तुम्ही तो व्यक्ती म्हणताय का ज्याचे डोके ठिकाणावर नाही?" असे अपमानास्पद वक्तव्यही केले.

राजकीय प्रवेशाचा संकेत – ‘द अमेरिका पार्टी’? वादाच्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी आता राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत “अमेरिकेत मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नवीन राजकीय पक्ष स्थापावा का?” असा प्रश्न जनतेला विचारला. विशेष म्हणजे त्यांच्या या पोलला जवळपास ८० टक्के लोकांचा पाठिंबा मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याच पोस्टमध्ये “द अमेरिका पार्टी” असे नाव सूचित करून त्यांनी एकप्रकारे आपल्या नव्या राजकीय वाटचालीचा इशारा दिला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण इलॉन मस्क यांचे हे वक्तव्य आणि सूचक पोस्ट यामुळे अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे. ते नवीन पक्ष स्थापन करणार का?, मध्यमवर्गासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभं करणार का?, यासारखे प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या समाजमाध्यमांवरील प्रभावामुळे हा पक्ष उदयास आल्यास तो भविष्यातील निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Google वर पाकिस्तानमधील लोक सर्वाधिक काय सर्च करतात? वाचून व्हाल हैराण
Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती