मुंबई-पुणे प्रवास कारने 24 मिनिटांत शक्य! दुबईच्या फ्लाईंग टॅक्सीने 45 मिनिटांचा प्रवास 12 मिनिटांत केला पार!

Published : Nov 17, 2025, 09:03 AM IST
Dubai Flying Taxi Service

सार

Dubai Flying Taxi Service : फ्लाईंग कार सेवा कार्बन उत्सर्जन कमी करेल, परदेशी गुंतवणूक आकर्षित करेल आणि हजारो नवीन नोकरीच्या संधी निर्माण करेल, असा अंदाज आहे.

Dubai Flying Taxi Service : UAE मधील फ्लाईंग टॅक्सीसाठीच्या पहिल्या स्टेशनचे बांधकाम वेगाने सुरू आहे. व्हर्टीपोर्टचे बांधकाम सुमारे 60 टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती रोड्स अँड ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने (RTA) दिली आहे. एअर टॅक्सीसाठी दुबई RTA ने तीन नवीन स्टेशनच्या बांधकामाची घोषणा केली आहे. चार मजली आणि 3100 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या स्टेशनमध्ये पार्किंग सुविधा, टेक-ऑफ आणि लँडिंग एरिया, चार्जिंग सुविधा आणि पॅसेंजर लाउंज यांचा समावेश असेल. दरवर्षी 42,000 लँडिंग आणि 1,70,000 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या टॅक्सीने प्रवास केल्यास मुंबई-पुणे प्रवास केवळ २४ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. तर औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूरला सुमारे ५० मिनिटे लागतील. तसेच पुणे-नागपूर प्रवास केला तर सुमारे दीड-ते दोन तास लागू शकतात. म्हणजे अतिशय कमी वेळात आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो.

 

 

एअर टॅक्सीने उड्डाण घेण्यासाठी दुबई सज्ज

एअर टॅक्सी प्रत्यक्षात आणण्याच्या बाबतीत दुबई वेगाने पुढे जात आहे, असे म्हणता येईल. पहिल्या व्हर्टीपोर्टचे बांधकाम दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सुरू आहे. हे स्टेशन दुबई इंटरनॅशनल व्हर्टीपोर्ट किंवा DXV म्हणून ओळखले जाईल. हे दिसायला विमानतळासारखेच आहे यात शंका नाही. चार मजली आणि 3100 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या स्टेशनमध्ये पार्किंग सुविधा, टेक-ऑफ आणि लँडिंग एरिया, चार्जिंग सुविधा आणि पॅसेंजर लाउंज यांचा समावेश असेल. दरवर्षी 42,000 लँडिंग आणि 1,70,000 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल, अशी अपेक्षा आहे.

 

 

हजारो नवीन नोकरीच्या संधी

दुबई विमानतळाव्यतिरिक्त, झबील दुबई मॉल, दुबई मरीना आणि पाम जुमेराह येथेही व्हर्टीपोर्टची घोषणा करण्यात आली आहे. हे सर्व मेट्रो स्टेशनशी जोडले जातील. फ्लाईंग कार सेवा कार्बन उत्सर्जन कमी करेल, परदेशी गुंतवणूक आकर्षित करेल आणि हजारो नवीन नोकरीच्या संधी निर्माण करेल, असा अंदाज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाम जुमेराहला कारने जायला सुमारे 45 मिनिटे लागतात, तर फ्लाईंग टॅक्सीने फक्त 12 मिनिटे लागतील, असे RTA चे अध्यक्ष मातर अल तायर यांनी आधीच सांगितले होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!