अमेरिका-इराण युद्धाला सुरवात? इराणच्या दिशेने अमेरिकेचे सैन्य रवाना, युद्धनौका येत असल्याचा ट्रम्प यांचा इशारा

Published : Jan 24, 2026, 07:55 AM IST
Donald Trump Warns Iran US Warship Is Approaching

सार

Donald Trump Warns Iran US Warship Is Approaching : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या दिशेने मोठी लष्करी तुकडी पाठवत असल्याचा इशारा दिला आहे. 

Donald Trump Warns Iran US Warship Is Approaching : 'आमची मोठी सैन्य तुकडी इराणच्या दिशेने जात आहे. आम्ही इराणवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत,' असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला इशारा दिला आहे. त्याचवेळी, 'कदाचित आम्हाला याचा वापर करावा लागणार नाही,' असेही सांगून त्यांनी इराण प्रशासनाला अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.

स्वित्झर्लंडमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'आम्ही इराणवर लक्ष ठेवून आहोत. त्या दिशेने आमची बरीच जहाजे जात आहेत. तिकडे आमची एक मोठी तुकडीच जात आहे. काहीही होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण आम्ही इराणवर खूप बारकाईने लक्ष ठेवून आहोत.'

लवकरच हल्ल्याचे संकेत

येत्या काही दिवसांत अरबी समुद्र किंवा पर्शियन आखात परिसरात अमेरिका नौदल हल्ला करेल, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. याला दुजोरा देत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एका अज्ञात ठिकाणी आपले लढाऊ विमान उतरवतानाचा फोटो 'X' वर शेअर केला आहे. थाड (Thaad) आणि पेट्रियट (Patriot) सारख्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणादेखील अमेरिकेकडून पश्चिम आशियामध्ये तैनात केल्या जात असल्याचे अमेरिकन माध्यमांनी म्हटले आहे. यावरून अमेरिका लवकरच इराणवर हल्ला करण्याचे संकेत मिळत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Traffic Issues: जगातील ट्रॅफिकग्रस्त शहरांची यादी जाहीर, बंगळूरचा कितवा क्रमांक?
मोदींबद्दल खूप आदर, पण भारत-पाक युद्ध मीच थांबवले, ट्रम्प यांनी जुनाच राग आळवला