
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार पाकिस्तानात करणार असून त्यादृष्टीने त्यांनी वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळं त्यांनी भारताच्या विरोधात टेरिफ वॉरची सुरुवात केली आहे. आता जगातील तीन महाशक्ती एकत्र आल्या असून अमेरिकेने याचा धसका घेतला आहे. भारत, चीन आणि रशिया या तीन शक्ती एकत्र आल्या आहेत.
भारत आणि रशिया दोन देशांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं जगभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनमुळे गमावल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आपण भारत आणि रशियाला चीनच्या सर्वात खोल आणि अंधाऱ्या छावणीत गमावल्याचे म्हटलं आहे. आशा आहे की त्यांचे संबंध दीर्घ आणि समृद्ध राहतील अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
यावेळी तीन देशांच्या नेत्यांचा म्हणजेच नरेंद्र मोदी, व्लादिमवीर पुतीन आणि क्षी जिनपिंग यांचा फोटो पोस्ट केला आहे. तीन नेते आता एकत्र भेटले होते आणि त्यांच्यामध्ये एकत्र आल्यावर चर्चा झाली होती. आता रशिया, अमेरिका आणि भारत हे तीन देश एकत्र आल्यामुळे अमेरिकेच्या चिंतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
भारत गेल्या काही काळापासून रशियाकडून तेल खरेदी करत आहे. आता संपूर्ण युरोप रशियाकडून त्याच्या तेलाची गरज पूर्णपणे भागवत आहे. अमेरिकेने त्यामुळं भारतावर २५ टक्के टेरिफ लावताना परत एकदा २५ टक्के टेरिफ लावला आहे. भारत पाकिस्तानमधील युद्ध मी थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांना भविष्यात भोगावा लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.