Elephant Killed Family : आधी दोघे, १४ वर्षांनी पुन्हा त्याच कुटुंबाला शोधून हत्तीचा बदला; एकाच घरातील चौघांना मारलं

Published : Jul 15, 2026, 09:06 PM IST
Elephant Killed People

सार

Dhurbe Elephant Killed Four Family Members : धुर्बे नावाच्या हत्तीने एकाच कुटुंबातील चौघांना मारलं. आधी दोघांचा बळी घेतला. नंतर १४ वर्षांनी त्याच कुटुंबातील दोघांना मारलं.

काठमांडू : धुर्बे नावाच्या हत्तीची कहाणी सध्या चर्चेत आहे. या हत्तीची त्याच्या आक्रमकतेमुळे मोठी दहशत आहे. या धुर्बे नावाच्या हत्तीने तब्बल 14 वर्षानंतर एकाच कुटुंबातील 4 जणांचा जीव घेतला. धुर्बे हत्तीने 2012 साली शनिचरा बोटे यांच्या आईवडिलांना ठार केलं, यामुळे या कुटुंबाने घाबरुन १५ ते १६ किमी स्थलांतर केलं होतं. विशेष म्हणजे या दरम्यान राप्ती नावाची नदी देखील आहे.

नेपाळमधील धुर्बे हत्तीने एकाच कुटुंबातील दोघांना ठार केलं. त्यानंतर त्या कुटुंबाने दुसरीकडे आपला संसार थाटला. ज्याठिकाणी त्यांनी नवा संसार उभा केला, ते ठिकाण जुन्या ठिकाणापासून १५ ते १६ किलोमीटर लांब आहे. हा हत्ती तिथे पोहोचणार नाही, असंच सर्वांना वाटतं होत, किंवा हत्ती बदला घेईल आणि तो देखील एवढ्या वर्षांनी हा विचारही कोणीच केलेला नव्हता, मात्र धुर्बे हत्ती त्यांच्या मागावर होता, त्याने जुलै 2026 मध्ये त्याच शनिचरा बोटे यांच्या घरावर रात्री हल्ला केला. रात्री घराच्या भिंतीवर कोणीतरी जोरात धडक मारत असल्याचा आवाज येत होता, त्याचक्षणी मातीच्या भिंती कोसळल्या.

आवाज ऐकून त्यांची सून आपल्या लहान मुलासह बाहेर आली. त्याचवेळी धुर्वेने दोघांवर झडप घालत त्यांना सोंडेने पकडलं. या घटनेत त्यांची 25 वर्षांची सून आशिका बोटे, आणि जो नातू या 2012 च्या घटनेननंतर जन्माला आला होता, त्या 4 वर्षाच्या नातवाचाही त्या हत्तीने बळी घेतला. बोटे यांच्या पत्नीने वाळलेल्या गवताला आग लावून हत्तीला पळवलं, मात्र त्या आगीत त्यांचं संपूर्ण घर जळून खाक झालं.

वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुर्बे हा अतिशय आक्रमक रानटी हत्ती आहे. धुर्बे याने 2010 ते 2016 या काळात 25 माणसांचा जीव घेतला. यात 2 लष्करी जवानांचा देखील समावेश आहे. 2012 मध्ये धुर्बे हत्तीला मारण्याचे आदेश देण्यात आले होते, यात त्यावर गोळीबार झाला आणि तो जखमीही झाला होता. यानंतर 4 वर्ष सर्वांना असंच वाटत होतं, की तो मारला गेला, पण पुन्हा 2016 मध्ये तो दिसून आला.

2020 आणि 2023 साली त्याच्या गळ्यात नवीन ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आली, पण हे दर एक तासांनी आता धुर्बे कुठे आहे हे सांगत होतं. त्यामुळे ट्रॅकिंग व्यवस्थित होत नव्हतं. धुर्बे हत्ती हा लहानपणापासून कळपातील बलाढ्य हत्तींना हुसकावून लावत होता, तेव्हापासूनच त्याच्या रानटी आक्रमक स्वभावाची ओळख होत होती.

आता धुर्बे कुठं जातोय, त्याच्या हालचाली माहित असव्यात म्हणून त्याच्यावर सॅटेलाइट कॉलरद्वारे नजर ठेवली जात आहे. धुर्बे हत्तीच्या या हिंसक वागण्याने सर्वच वन्यजीव-प्राणी अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हत्तीची बोलण्याची, संकेत देण्याची एक भाषा असते. पण हत्ती अतिशय शांत प्राणी आहे, अशीच ओळख आहे. मात्र धुर्बे नावाच्या हत्तीमुळे हत्ती आणि त्यांचं इतरांशी असलेलं नातं किंवा आक्रमकता हे विषय चर्चेत आले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hormuz Strait : ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न! 20% टोल रद्द, आखाती देशांसोबत नवी डील
Balochistan: पाकिस्तानचे पुन्हा तुकडे? बलुचिस्तानची करन्सी, राष्ट्रगीत घोषित