अनेक वापरकर्ते मस्क यांच्या दाव्याला समर्थन देत आहेत.
न्यूयॉर्क: दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को एका तासात प्रवास करणे शक्य होईल, असा दावा स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी केला आहे. त्यांची कंपनी स्पेसएक्स विक्रमी वेळेत प्रवाशांना प्रमुख शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मस्क म्हणाले. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ६ नोव्हेंबर रोजी एका वापरकर्त्याने शेअर केलेल्या व्हिडिओला उत्तर देताना मस्क यांनी हा दावा केला.
ट्रम्प प्रशासनाच्या काळात काही वर्षांतच स्पेसएक्सच्या स्टारशिप अर्थ-टू-अर्थ उड्डाणांना फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ची मान्यता मिळू शकते, असे वापरकर्त्याने म्हटले आहे. "सर्वात लांब प्रवास ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत. पृथ्वीवरील कुठेही एका तासाच्या आत. आता हे शक्य आहे". स्पेसएक्सच्या तंत्रज्ञानाच्या क्षमता दर्शविणार्या व्हिडिओला उत्तर देताना मस्क म्हणाले. अनेक वापरकर्ते मस्क यांच्या दाव्याला समर्थन देत आहेत.
लॉस एंजेलिस आणि टोरंटोमध्ये २४ मिनिटे, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये २९ मिनिटे आणि दिल्ली आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ३० मिनिटे असा प्रवास स्पेसएक्सने कल्पना केली आहे, असे डेली मेलच्या वृत्तात म्हटले आहे. स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या ३९५ फूट लांबीच्या स्टारशिप या अंतराळयानात १,००० प्रवाशांची क्षमता असेल. सुमारे एक दशकापूर्वी स्पेसएक्सने ही कल्पना प्रथम मांडली होती.