
चीनमधील एका माणसाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलाय. या माणसाने आपल्या दुचाकीच्या मागे धावणाऱ्या भटके कुत्र्यांना मारण्यासाठी गाडीलाच एक काठी बांधली आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, या माणसाने गाडीच्या हँडलला एक लांब काठी जोडली आहे. जेव्हा कुत्रे त्याच्या गाडीच्या मागे किंवा बाजूने धावतात, तेव्हा तो या काठीने त्यांना मारतो. त्याच्या मागे एक लहान मूल बसलंय, जे कुत्र्यांना मार खाताना पाहून जोरजोरात हसताना दिसतंय.
China MAN CREATES ‘DOG-BEATING STICK’ that SMACKS STRAY DOGS in FACE and BODY as they CHASE HIS BIKE pic.twitter.com/S65xutIT4y
— RT (@RT_com) October 2, 2026
🇨🇳 A man in China reportedly created a stick device that strikes stray dogs chasing his bike. An unusual invention, though it could injure the animals. pic.twitter.com/kL4vgnyljv
— GFN (@GFNIND) October 2, 2026
या व्हिडिओमध्ये अनेकदा तो माणूस कुत्र्यांना आपल्या मागे येण्यापासून रोखण्यात यशस्वी झाल्याचं दिसतं. पण, या कुत्र्यांनी याआधी त्याच्यावर हल्ला केला होता का, किंवा या भागात त्याला आधी असा त्रास झाला होता का, हे या व्हिडिओमधून स्पष्ट होत नाही.
या व्हिडिओमुळे इंटरनेटवर लोकांचे दोन गट पडले आहेत. काही युजर्सनी या माणसाची बाजू घेतली आहे. सायकल किंवा स्कूटर चालवणाऱ्यांसाठी भटके कुत्रे धोकादायक ठरू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. एका युजरने कमेंटमध्ये सांगितलं की, थायलंडमध्ये सायकल चालवताना त्याच्यावर भटके कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे कुत्र्यांना दूर ठेवणारं असं एखादं जुगाड फायद्याचं ठरू शकतं, असं तो म्हणाला.
दुसरीकडे, अनेक लोकांनी या पद्धतीवर कडक टीका केली आहे. ही प्राण्यांवरील क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलंय. कुत्र्यांना मारण्याऐवजी पाण्याचा स्प्रे मारून किंवा त्यांना इजा न पोहोचवता दूर करण्याचे इतर मार्ग वापरायला हवेत, असा सल्ला काहींनी दिला आहे.
कुत्रे नेमके या माणसाच्या मागे का धावत होते, असा प्रश्न काही लोकांनी विचारलाय. तर, तिथून नुसतं वेगात निघून जाणं पुरेसं होतं, असं काहींचं म्हणणं आहे. या सगळ्यात ते लहान मूल ज्या प्रकारे हसत होतं, त्याबद्दलही अनेक युजर्सनी चिंता व्यक्त केली आहे.
दुचाकीवरून प्रवास करताना भटके कुत्रे मागे लागल्यास काय करावं, यावर या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काहींना ही काठी एक चांगला उपाय वाटते, तर काहींच्या मते प्राण्यांना इजा न पोहोचवणं हेच आपलं प्राधान्य असायला हवं.
China MAN CREATES ‘DOG-BEATING STICK’ that SMACKS STRAY DOGS in FACE and BODY as they CHASE HIS BIKE, i will name it back to your house... pic.twitter.com/sm9xeeBIPC
— HardBill (@JoshuaSorshima) October 3, 2026
A necessary innovation considering how poorly trained dogs are these days. You can tell he's deliberately ensured that the stick isn't powerful enough to harm the dogs either which is great; very considerate. https://t.co/PvKMzVsMhS
— Von Herzog (@HerzogVonEhren) October 3, 2026