लग्नाला 70 सहकाऱ्यांना बोलावले, 6 टेबल बुक केले, आली फक्त एक, नववधूने नोकरीच सोडली

Published : Jan 28, 2026, 08:55 AM IST
Bride Resigns After 69 Colleagues Skip Her Wedding

सार

Bride Resigns After 69 Colleagues Skip Her Wedding : नातेवाईकांच्या गर्दीत सहकाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तिने सहा टेबल आगाऊ आरक्षित केले होते. मात्र, आमंत्रित केलेल्या 70 पैकी 69 जण लग्नाला आलेच नाहीत.

Bride Resigns After 69 Colleagues Skip Her Wedding : एका तरुणीने जवळचे नातेवाईक आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना लग्नासाठी आमंत्रित केले. पण ऑफिसमधून फक्त एकच व्यक्ती आली. त्यामुळे नाराज होऊन तरुणीने नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना चीनमधील आहे. सहकाऱ्यांच्या सोयीनुसार सुट्टीच्या दिवशी लग्न ठरवण्यात आले होते. ऑफिसमधील काही मोजक्या लोकांनाच बोलावणे योग्य नाही, असा विचार करून तरुणीने तिच्या 70 सहकाऱ्यांना लग्नाचे आमंत्रण दिले. तिने सर्वांना वैयक्तिकरित्या फोन केला आणि लग्नाचा दिवस जवळ आल्यावर मेसेजद्वारे आठवण करून दिली. ज्या कंपनीत ती पाच वर्षांपासून काम करत होती, त्याच कंपनीतील सहकाऱ्यांनी तिच्या लग्नाकडे पाठ फिरवली. लग्न सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ठरवले होते. त्यामुळे लग्नाला उपस्थित राहण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे बहुतेक सहकाऱ्यांनी आमंत्रण देताना सांगितले होते. लग्नाची तारीख जवळ आल्यावर तिने सोशल मीडियावरून आणि ऑफिसच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरही मेसेज पाठवून आठवण करून दिली होती. 

नातेवाईकांच्या गर्दीत सहकाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तिने त्यांच्यासाठी सहा टेबल आगाऊ आरक्षित केले होते. मात्र, आमंत्रित केलेल्या 70 पैकी 69 जण लग्नाला आलेच नाहीत. हा अनुभव तरुणीसाठी अत्यंत अपमानकारक आणि वेदनादायी होता. यानंतर तिने पाच वर्षांपासून काम करत असलेल्या कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला. तिने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

BMW Gift: थंडीत कुडकुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉसने दिली चक्क BMW कार!
Bone Marrow Cake: महिलेने बाळासाठी बनवला कलिंगड आणि बोन मॅरोचा केक!