बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी गणवेश जप्त, भारतासाठी धोका वाढल्याची चिन्हं

Published : Jun 07, 2025, 09:00 PM IST
bangladesh combat uniform seizure

सार

बांगलादेशमध्ये 50,000 लष्करी गणवेश जप्त करण्यात आले आहेत, जे KNF या दहशतवादी संघटनेशी जोडले गेले आहेत. ही घटना भारताच्या ईशान्य सीमेसाठी धोकादायक ठरू शकते आणि यामागे एका मोठ्या 'प्रॉक्सी वॉर'ची शक्यता वर्तवली जात आहे.

बांगलादेशमधून समोर आलेल्या एका गंभीर घटनेने भारतीय गुप्तचर आणि सुरक्षाव्यवस्थेत खळबळ उडवली आहे. चिटगावमधील एका गुप्त उत्पादन युनिटमधून पाच हजार नव्हे, तब्बल पन्नास हजार लष्करी गणवेश जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व 'कुकी-चिन नॅशनल फ्रंट (KNF)' या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. ही कारवाई बांगलादेश लष्कराने मागील पंधरवड्यात केली असून, भारताच्या ईशान्य सीमाभागासाठी हे संकेत देणारे धोक्याचे घंटानाद मानले जात आहेत.

पोलिसांनी माहिती दडपली, संशय वाढतोय

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, चिटगाव मेट्रोपॉलिटन पोलिसांनी ही घटना तब्बल आठवडाभर दडपून ठेवली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर बोलण्यास नकार देत “वरून आदेश आहेत” असे सांगत आहेत, ज्यामुळे या प्रकरणात राजकीय संरक्षण असलेल्या सखोल नेटवर्कचा संशय अधिक गडद झाला आहे.

संख्या प्रश्न निर्माण करणारी, एवढे गणवेश कशासाठी?

भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी यामागील आकड्यांचा अभ्यास करत असताना प्रश्न उपस्थित केला आहे की, जेव्हा KNF कडे १०,०००–१५,००० च्या आसपासच लढाऊ सदस्य असू शकतात, तेव्हा पन्नास हजार गणवेश का तयार केले गेले?

एवढे गणवेश कोणासाठी होते?

हा खर्च कोणी केला? (सुमारे ३.५ ते ४ कोटी रुपये किंवा ४–५ कोटी बांगलादेशी टाका)

यामागे खऱ्या अर्थाने कोण आहे?

‘प्रॉक्सी वॉर’ ची नांदी?

भारतीय धोरण तज्ञ या संपूर्ण घटनेकडे फक्त स्थानिक बंडाच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत, तर हे एका सुसंघटित, आर्थिक पाठबळ असलेल्या 'प्रॉक्सी वॉर' (परकीय हाती असलेल्या छुप्या युद्ध) चे प्रारंभिक स्वरूप असल्याचं मानत आहेत.

KNF चा भारतातील मिझोराम व मणिपूर या राज्यांतील जमातींशी खोल सामाजिक व जातीय संबंध आहेत. म्यानमारमध्येही याच समुदायाला 'चिन' म्हणून ओळखलं जातं. हे एक त्रै-जंक्शन (तीन देशांतील एकत्रित बंड) तयार करत आहे.

KNF आणि इस्लामी दहशतवाद्यांचा धोकादायक संगम

KNF च्या संबंधांची माहिती धक्कादायक आहे. या संघटनेने “जमाआ’तुल अंसार फिल हिंदाल शार्किया (JAFHS)” या नव्याने उदयास आलेल्या इस्लामी अतिरेकी संघटनेला प्रशिक्षण दिलं आहे.

JAFHS ही संघटना Ansarullah Bangla Team (ABT), Neo-JMB आणि HuJI या अतिरेकी संघटनांच्या सदस्यांच्या समन्वयातून निर्माण झाली असून, ढाक्यातील तुरुंगांतील भेटींमधून तिचं संघटन झालं.

याचा अर्थ असा की, KNF सारख्या स्थानिक जमातीय बंडखोर संघटना आता धार्मिक अतिरेकी गटांशी हातमिळवणी करत आहेत. हे भारताच्या ईशान्येसाठी एक अतिशय धोकादायक ‘हायब्रिड’ (संमिश्र) धोका आहे.

भारतासाठी वाढत चाललेली चिंता

KNF चं नाव प्रथम मे २०२३ मध्ये चर्चेत आलं, जेव्हा बांदरबनमध्ये दोन बांगलादेशी सैनिकांचा खून झाला. नंतरच्या तपासणीत KNF ने ऑक्टोबर २०२२ पासूनच Chittagong Hill Tracts (CHT) मध्ये JAFHS च्या सदस्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं होतं, हेही स्पष्ट झालं.

ही धोकादायक हातमिळवणी भारतासाठी विशेषतः मिझोराम व मणिपूरमध्ये तणाव वाढवणारी आहे, कारण हे भाग सामाजिक, जातीय आणि राजकीयदृष्ट्या आधीच अस्थिर आहेत.

नवीन ‘महासत्ता खेळी’ ची तयारी?

भारतीय गुप्तचर यंत्रणा आता हे प्रश्न विचारत आहेत

ही सगळी तयारी एका हायब्रीड प्रॉक्सी वॉरची आहे का?

KNF फक्त एक मुखवटा आहे का, आणि खरी सूत्रधार शक्ती परकीय आहे का?

हे सगळं कोण चालवत आहे, आणि अंतिमतः 'द ग्रेट गेम' मध्ये कोण कोणते प्यादे असणार आहेत?

बांगलादेशातील 'अंतरिम सरकार' वर संशय वाढतोय

बांगलादेशात सध्या अंतरिम सरकारप्रमुख मोहम्मद युनुस यांच्यावर पश्चिमी हितसंबंधांशी संबंध असल्याचे आरोप वाढत आहेत. यामुळे भारतीय विश्लेषकांचं लक्ष या अस्थिरतेच्या मुळाशी असलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळलं आहे.

हे फक्त बांगलादेशातील अंतर्गत बंड नाही, तर हा एक नियोजित भू-राजकीय डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामध्ये दहशतवाद, जातीवाद आणि परकीय हस्तक्षेप एकत्र आले आहेत.

भारताची शक्य कृती

या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून कदाचित पुढील धोरणात्मक पावले उचलली जातील

बांगलादेशशी धोरणात्मक संवाद वाढवणे

सीमावर्ती गुप्त माहिती यंत्रणा अधिक मजबूत करणे

सैन्याच्या आपत्कालीन योजनांचा पुनर्विचार

म्यानमार आणि इतर शेजारी देशांसोबत KNF व JAFHS च्या हालचालींवर संयुक्त लक्ष ठेवणे

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Google वर पाकिस्तानमधील लोक सर्वाधिक काय सर्च करतात? वाचून व्हाल हैराण
Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती