बँकॉकमधील पबला भीषण आग; 27 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Published : Jul 13, 2026, 08:30 AM IST
Bangkok Fire

सार

बँकॉकमधील एका पबमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागून 27 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे.

मुंबई : थायलंडची राजधानी बँकॉक येथे सोमवारी पहाटे एका पबमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळजवळ 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. याबद्दलची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मध्यरात्रीनंतर लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकच्या उत्तरेकडील 'ना लाडप्राओ' (Na Ladprao) पबमध्ये मध्यरात्रीनंतर आग लागली. घटनेची माहिती मिळताच बचाव आणि अग्निशमन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत आगीचे मोठे लोट पबमधून बाहेर पडत होते. 

सर्किट ब्रेकरमधून धूर

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीराकुल (Anutin Charnvirakul) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रम सुरू असताना रंगमंचावरील सर्किट ब्रेकरमधून धूर निघू लागला. हे तेथील कलाकारांच्या निदर्शनास आले. काही क्षणांत वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण ठिकाणी आग पसरली गेली. 

विषारी धुरामुळे जीवितहानी

बँकॉकचे गव्हर्नर चॅडचार्ट सित्तीपुंत यांनी सांगितले की, छतावरील डेकोरेशनच्या साहित्याने वेगाने पेट घेतला. यामधून मोठ्या प्रमाणात विषारी धूर बाहेर पडू लागला. हा धूर काही मिनिटांत संपूर्ण पबमध्ये पसरला आणि अनेक जणांना एक्झिट करणे अशक्य झाले. 

शौचालयाजवळ आढळले अनेक मृतदेह

तपासादरम्यान अनेक मृतदेह पबच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाजवळ आढळले. धूर आणि आगीपासून बचाव करण्यासाठी हे लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दुर्घटनेबद्दल अधिक तपास सुरू

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी स्फोटानंतर आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाने संयुक्त तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास केला जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Robot Wedding: रशियात पार पडलं दोन रोबोटचं लग्न, 'डॉग' रोबोटनं आणल्या अंगठ्या! पाहा VIDEO
Iran Drones : ड्रोन पॉवर | युद्धाच्या काळात इराणने ड्रोन उत्पादन तिपटीने वाढवलं!