Amazon layoffs: 16 हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड, भारताला सर्वाधिक फटका

Published : Jan 27, 2026, 01:48 PM IST

Amazon lay off: Amazon कंपनीकडून आज 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. 27 जानेवारीपासून Amazon मध्ये नोकरकपात सुरू होत आहे. यावेळी भारतात सर्वाधिक नोकरकपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

PREV
16
नोकरकपातीचा धक्का

एकीकडे अनेक देशांमधील युद्ध, अमेरिकेच्या धोरणांमुळे केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर जागतिक व्यापारावर होणारा परिणाम, आर्थिक मंदी यांसारख्या अनेक अडथळ्यांमध्ये आता नोकरकपातीचा धक्का बसत आहे. अनेक कंपन्या आधीच कर्मचारी कपात करत आहेत. आता Amazon ची पाळी आहे.

26
27 जानेवारीला 16 हजार नोकऱ्या जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, Amazon 27 जानेवारी रोजी तब्बल 16 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. 2026 मधील Amazon ची नोकरकपात उद्यापासून सुरू होत आहे. ही कपात टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे. यामुळे Amazon च्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

36
भारतात सर्वाधिक नोकरकपात

यावेळी Amazon च्या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय टीम्समधूनच सर्वाधिक कर्मचारी कपात केली जाणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. भारतात Amazon ने नोकरकपात सुरू केल्यास केवळ रोजगारावरच नव्हे, तर बाजारपेठेवरही परिणाम होईल.

46
कोणत्या विभागात सर्वाधिक कपात?

Amazon वेब सर्व्हिसेस (AWS), Amazon प्राइमसह अनेक विभागांमध्ये नोकरकपात होणार आहे. Amazon ने 2025 मध्येच नोकरकपात सुरू केली होती. कंपनीने यापूर्वीच 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

56
2026 अखेरपर्यंत 30 हजार नोकरकपात

2026 च्या अखेरीस Amazon एकूण 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. यापूर्वी काढलेले 14 हजार आणि आता काढले जाणारे 16 हजार, असे एकूण 30 हजार Amazon कर्मचारी आपली नोकरी गमावतील. Amazon ने आधीच पुनर्रचनेची घोषणा केली आहे.

66
2022-23 मध्ये 27 हजार नोकरकपात

कोविडच्या फटक्यातून बाजारपेठ सावरत असताना, Amazon ने 2022-23 मध्ये तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. जगभरात Amazon चे 1.57 दशलक्ष कर्मचारी आहेत. त्यापैकी कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या 3 लाख 50 हजार आहे.

Read more Photos on

Recommended Stories