Plane Crash: न्यूयॉर्कमध्ये मोठी दुर्घटना, लँडिंगवेळी विमान थेट फायरट्रकला धडकलं

Published : Mar 23, 2026, 04:06 PM IST
Air Canada Plane Collides With Fire Truck at LaGuardia Airport Pilot and Co Pilot Dead

सार

Air Canada Plane Collides With Fire Truck at LaGuardia Airport Pilot and Co Pilot Dead: न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर लँडिंग करताना एअर कॅनडाचं विमान एका फायरट्रकला धडकलं. या भीषण अपघातात पायलट आणि को-पायलटचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Air Canada Plane Collides With Fire Truck at LaGuardia Airport Pilot and Co Pilot Dead न्यूयॉर्कमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इथल्या लागार्डिया विमानतळावर (LaGuardia Airport) लँडिंग करताना एक प्रवासी विमान थेट फायरट्रकला धडकलं. या भीषण अपघातात विमानाचे पायलट आणि को-पायलट जागीच ठार झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

एअर कॅनडा एक्सप्रेसचं (Air Canada Express) CRJ 900 मॉडेलचं हे विमान होतं. अपघातावेळी विमानात ७२ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ज्या फायरट्रकला विमान धडकलं, तो पोलीस अधिकारी चालवत होते. या धडकेत त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फायरट्रक रनवे क्रमांक ४ वर अडकलेल्या दुसऱ्या विमानाला हटवण्यासाठी जात होता, त्याचवेळी हा अपघात घडला.

कोरस एव्हिएशन (Chorus Aviation) आणि जॅझ (Jazz) या कंपन्यांची या विमानात भागीदारी आहे. ही धडक इतकी जोरदार होती की विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धडकेनंतर विमानाचा तोल गेला आणि मागचा भाग जमिनीवर आदळला, तर पुढचा भाग वर उचलला गेला. यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. मात्र, अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही.

घटनेनंतर फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (Federal Aviation Administration) विमानतळ तात्काळ बंद केलं. जवळपास १८ विमानं दुसऱ्या विमानतळांवर वळवण्यात आली, तर अनेक विमानं जिथून निघाली होती तिथेच परत पाठवण्यात आली. अपघात नेमका कशामुळे झाला आणि यात किती नुकसान झालं, याबाबतची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. लागार्डिया हे न्यूयॉर्कमधील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pakistan Fuel Price Hike : पाकिस्तानात इंधन दरांचा स्फोट! हाय-ऑक्टेन पेट्रोलवर तब्बल 200% कर वाढ, महागाईचा फटका तीव्र
West Asia Conflict: इराणवर हल्ले सुरूच ठेवा, आखाती देशांचा अमेरिकेवर दबाव