बांगलादेशातील 'या' सर्वोच्च नेत्याचा पुतळा आंदोलनकर्त्यांनी जेसीबीने पाडला

बांगलादेशात सध्या विविध प्रकारे आंदोलने सुरू आहेत. पंतप्रधान शेख हसीना भारतात असून लंडनला जाणार आहेत. आंदोलकांनी पंतप्रधानांचे कार्यालय, संसद आणि अन्य सरकारी कार्यालयांमध्ये घुसखोरी केली आहे. 

बांग्लादेशात सध्याच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारे उठाव होत असल्याचे दिसून येत आहे. या देशाच्या पंतप्रधान भारतात आल्या असून येथून त्या लंडनमध्ये जाणार असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांचे कार्यालय, संसद आणि सरकारच्या विविध कार्यलयांमध्ये आंदोलक घुसल्याचे दिसून येत आहे. या देशात शेख हसीना यांच्या वडिलांचा पुतळा पाडल्याचे व्हिडीओ आणि फोटोंमधून दिसून आले आहे.

बंगबंधु शेख मुजीब्बुर रेहमान हे शेख हसीना यांचे वडील होते. त्यांचा पुतळा येथील आंदोलनकर्त्यांनी जेसीबीच्या मदतीने पाडून टाकला आहे. यावेळी या पुतळ्यावर एक व्यक्ती चढला असून तो हातोड्याच्या मदतीने पुतळा पाडत आहे. त्यावेळी त्याच्यासमोर हजारो आंदोलनकर्ते असून त्यांच्या सगळ्यांच जोश हा व्हिडिओमधून दिसून येत आहे. यावेळी प्रदर्शन करणाऱ्यांनी पुतळा पाडल्यानंतर शेख हसीना यांच्या पक्षाचे कार्यालय तोडण्यात आले आहे. 

शेख हसीना यांच्या वडिलांना बांग्लादेशचे वडीलबंधू म्हणूनही ओळखले जात होते. पाकिस्तानकडून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी मोठा हातभार लावला होता. त्यांचा पुतळा पाडल्यामुळे बांगलादेशमधील तरुणांनी सुरु केलेला संघर्ष किती मोठा झाला आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे येथील वातावरण बिघडून गेले आहे. 

Share this article