त्बिलिसी: जार्जियामध्ये एका पर्वतीय रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये १२ भारतीयांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जॉर्जियातील गुडौरी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. तेथे असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले की, जॉर्जियामधील माउंटन रिसॉर्ट गुडौरी येथील रेस्टॉरंटमध्ये १२ भारतीयांचे मृतदेह सापडले आहेत. प्रथमदर्शनी, या मृतदेहांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा प्राणघातक हल्ला किंवा इतर कोणत्याही जबरदस्तीच्या खुणा आढळल्या नाहीत. कार्बन मोनॉक्साईड वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
भारतीय उच्चायुक्तालयाच्या माहिती नुसार ही घटना जॉर्जियामधील माउंटन रिसॉर्ट गुडौरी येथील रेस्टॉरंटमध्ये घडली. येथे काम करणारे १२ भारतीय नागरिक एका खोलीत मृतावस्थेत आढळले. जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने सांगितले की प्राथमिक तपासणीत दुखापत किंवा हिंसाचाराची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. त्बिलिसीमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले की मृतांमध्ये १२ भारतीय नागरिक आहेत तर एक जॉर्जियन नागरिक आहे. रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत्यूचे प्राथमिक कारण कार्बन मोनोऑक्साइड विषबाधा असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी जनरेटरचा वापर केल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, वीज खंडित झाल्यानंतर रेस्टॉरंटमधील दिवे लावण्यासाठी जनरेटरचा वापर करण्यात आला. या कारणामुळे मृत्यू होऊ शकतो. तथापि, अद्याप कोणीही याची पुष्टी करत नाही.
शोक व्यक्त करताना, भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले की, गुडौरीमध्ये १२ भारतीय नागरिकांच्या मृत्यूमुळे आम्हाला दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांना मनापासून संवेदना. आपला जीव गमावलेल्या भारतीय नागरिकांचा तपशील मिळविण्यासाठी उच्चायुक्तालय स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल.
आणखी वाचा-
हंपबॅक व्हेलचा अविश्वसनीय १३,००० किमीचा प्रवास
इस्रायलने सीरियावर टाकला 'भूकंप बॉम्ब'! भूकंपासारखे धक्के, पाहा व्हिडिओ