Zelio E-Mobility ने डिलिव्हरी पार्टनर्स आणि छोट्या व्यवसायांसाठी आपली Logix Cargo ई-स्कूटर 2026 फेसलिफ्ट मॉडेल लाँच केली आहे. याची सुरुवातीची किंमत ₹56,551 आहे. यामधील फीचर्स कोणते? वजन क्षमता किती ? जाणून घ्या या लेखात
भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन, Zelio E-Mobility ने Logix Cargo ई-स्कूटर 2026 फेसलिफ्ट मॉडेल लाँच केली आहे. ही स्कूटर डिलिव्हरी पार्टनर्स आणि छोट्या व्यवसायांसाठी उपयुक्त आहे. याची सुरुवातीची किंमत ₹56,551 आहे.
23
टेलिस्कोपिक आणि स्प्रिंग-लोडेड सस्पेन्शन
नवीन 2026 Zelio Logix स्कूटरला आकर्षक लुक दिला आहे. ही ग्रे, पांढरा, हिरवा, हिरवा-काळा, लाल-काळा रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची 150 किलो वजन क्षमता आहे. यात टेलिस्कोपिक आणि स्प्रिंग-लोडेड सस्पेन्शन आहे. पुढील आणि मागील टायर 90/90-12 आणि 90/100-10 आकाराचे आहेत.
33
डिजिटल डॅशबोर्ड, कीलेस एंट्री, मोबाईल चार्जिंग
यात डिजिटल डॅशबोर्ड, कीलेस एंट्री, मोबाईल चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेसाठी अँटी-थेफ्ट सिस्टीम, साईड स्टँड अलर्ट आणि रिअल-टाइम व्हेईकल डायग्नोस्टिक्स यांसारखे स्मार्ट फीचर्स आहेत. या स्कूटरला 2 वर्षांची वाहन वॉरंटी आणि 1 वर्षाची बॅटरी वॉरंटी मिळते. एका चार्जमध्ये ही स्कूटर 60 ते 70 किमीची रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे.