Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांना नेहमी एक प्रश्न पडतो, गुगल टीव्ही घ्यावा की फायर टीव्ही? दिसायला सारखे असले तरी या दोन्ही टीव्हीमध्ये काय फरक आहे? आणि दोन्हीपैकी कोणता टीव्ही चांगला आहे? याबद्दलची माहिती आता जाणून घेऊया.
गुगल टीव्ही हा गुगलचा अँड्रॉइड आधारित प्लॅटफॉर्म आहे. यात YouTube, Assistant सारख्या सेवा आहेत. फायर टीव्ही हा ॲमेझॉनचा असून, यात Prime Video आणि Alexa सारख्या सेवा मिळतात.
गुगल टीव्हीचा इंटरफेस क्लीन असून जाहिराती कमी आहेत. यात ॲप्सची मांडणी बदलता येते. फायर टीव्हीवर प्राइम व्हिडिओला प्राधान्य आणि जाहिराती जास्त दिसतात. यात कस्टमायझेशन मर्यादित आहे.
गुगल टीव्ही 4K, डॉल्बी व्हिजन, HDR10+ सपोर्ट करतो. फायर टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट नाही. त्यामुळे व्हिडिओ क्वालिटीसाठी गुगल टीव्ही चांगला आहे. ऑडिओमध्ये दोन्ही सारखेच आहेत.
55
कोणासाठी कोणता टीव्ही चांगला आहे?
अँड्रॉइड युझर्स आणि ज्यांना क्लीन इंटरफेस हवा आहे, त्यांच्यासाठी गुगल टीव्ही बेस्ट आहे. ॲमेझॉन प्राइम सदस्य आणि Alexa युझर्ससाठी फायर टीव्ही हा एक चांगला पर्याय आहे.