विमान प्रवासात मोबाईल एअरप्लेन मोडवर का ठेवावा? सेफ्टी रूल काय सांगतो. विमान कर्मचारी देत असलेल्या सूचनांमध्ये फ्लाईट मोड अलर्ट असतोच. हे का महत्त्वाचं आहे?, हे जाणून घेऊयात.
विमान प्रवासात सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. बोर्डिंगनंतर कर्मचारी सीट बेल्ट, आपत्कालीन परिस्थिती आणि इतर नियमांची माहिती देतात. यावेळी सर्व प्रवाशांना मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवण्यास सांगितले जाते.
26
फ्लाईट मोडमागील सुरक्षा
फ्लाईट मोडमागे विमानाची सुरक्षा दडलेली आहे. सध्याचे नेटवर्क धोकादायक नसले तरी, टेक-ऑफ आणि लँडिंगवेळी लहान सिग्नलही महत्त्वाचा असतो. मोबाईल एअरप्लेन मोडवर टाकल्यावर फक्त ब्लूटूथ आणि वाय-फाय काम करते. मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद होते.
36
फ्लाईट मोडमुळे काय समस्या?
एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, मोबाईल सिग्नल ऑन असल्यास एका फोनमुळे विमानाला जास्त धोका होत नाही. पण विमानात सर्वांचे फोन नेटवर्क एअरक्राफ्ट कम्युनिकेशन सिस्टीमवर परिणाम करू शकते. यामुळे टेक-ऑफ आणि लँडिंगवेळी समस्या येऊ शकते.
प्रवासात फ्लाईट मोड ऑन नसल्यास, मोबाईल नेटवर्क शोधतो. सर्व मोबाईल जमिनीवरील टॉवरवर अवलंबून असतात. सर्वांचे फोन नेटवर्क शोधू लागल्यास ते एअरक्राफ्टच्या नेव्हिगेशन आणि कंट्रोल सिस्टीमवर परिणाम करू शकते.
56
पायलट आणि ट्रॅफिक कंट्रोल संपर्क
पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील कनेक्शनमध्ये मोबाईल नेटवर्कमुळे अडथळा येऊ शकतो. टेक-ऑफ आणि लँडिंग हे प्रवासातील सर्वात महत्त्वाचे आणि धोकादायक क्षण असतात. एका क्षणाची चूकही अपघाताला कारण ठरू शकते. त्यामुळे फ्लाईट मोड अनिवार्य आहे.
66
आधुनिक एअरक्राफ्टमध्ये समस्या कमी
आधुनिक विमानांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या विमानांच्या कम्युनिकेशन नेटवर्कवर मोबाईल सिग्नलचा परिणाम होण्याची शक्यता कमी असते. तरीही, टेक-ऑफ आणि लँडिंगवेळी सुरक्षेसाठी मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवणे महत्त्वाचे आहे.