WhatsApp Plus: आता व्हॉट्सॲप बदला तुमच्या मर्जीप्रमाणे! जाणून घ्या काय आहे खास

Published : May 12, 2026, 10:24 PM IST

WhatsApp Plus: व्हॉट्सॲप 'व्हॉट्सॲप प्लस' नावाची नवी प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा आणत आहे. या सबस्क्रिप्शनमुळे युजर्सना ॲपचा लूक, आयकॉन आणि रिंगटोन बदलता येणार आहेत. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

PREV
15
व्हॉट्सॲप प्लस
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, iOS 26.17.74 व्हर्जन वापरणाऱ्या काही युजर्सना हे 'व्हॉट्सॲप प्लस' फीचर दिसू लागले आहे. युजर्स त्यांच्या व्हॉट्सॲप सेटिंग्जमध्ये जाऊन हे सबस्क्रिप्शन तपासू शकतात. सुरुवातीला ही सुविधा फक्त सामान्य व्हॉट्सॲप मेसेंजर युजर्ससाठी आहे. व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंटसाठी ती अद्याप आलेली नाही. ही एक मासिक सबस्क्रिप्शन सेवा आहे, जी युजरने रद्द न केल्यास दर महिन्याला आपोआप रिन्यू होईल.
25
व्हॉट्सॲप नवीन अपडेट

या नव्या सबस्क्रिप्शन प्लॅनचे मुख्य आकर्षण म्हणजे यात मिळणारे कस्टमायझेशन फीचर्स. व्हॉट्सॲप प्लस युजर्सना 18 नवीन ॲक्सेंट कलर्स आणि 14 प्रकारचे ॲप आयकॉन्स मिळतील. व्हायब्रंट ब्लू, रॉयल पर्पल, फॉरेस्ट ग्रीन, गोल्डन यलो अशा रंगांचा वापर करून तुम्ही व्हॉट्सॲपचा लूक बदलू शकता. यामुळे एक सामान्य मेसेजिंग ॲप आता पर्सनल स्टाईल प्लॅटफॉर्मसारखं बनेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

35
व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव अधिक रंगतदार
सामान्य युजर्स फक्त तीन चॅट्स पिन करू शकतात, पण व्हॉट्सॲप प्लस युजर्सना तब्बल २० चॅट्स पिन करता येतील. इतकंच नाही, तर विशिष्ट चॅट लिस्टसाठी वेगळी थीम, रिंगटोन आणि नोटिफिकेशन टोन सेट करण्याची सुविधाही मिळेल. या सबस्क्रिप्शनमध्ये फ्लटर, रिपल, क्वेस्ट, बबल, कार्निव्हलसारखे १० नवीन रिंगटोन पर्याय दिले आहेत. यामुळे व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव अधिक रंगतदार आणि पर्सनलाइज्ड होईल.
45
सबस्क्रिप्शनसाठी महिन्याला २७४ रुपये शुल्क
युरोपीय देशांमध्ये या सबस्क्रिप्शनसाठी महिन्याला २.४९ युरो म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे २७४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. देशानुसार या शुल्कात बदल असू शकतो, अशीही माहिती आहे. भविष्यात यात आणखी प्रीमियम फीचर्स जोडले जातील असंही म्हटलं जातं. पण, जे युजर्स सबस्क्रिप्शन घेणार नाहीत, त्यांच्यासाठी सध्याच्या मोफत सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही, त्यामुळे सामान्य युजर्सनी काळजी करण्याची गरज नाही, असं व्हॉट्सॲपने स्पष्ट केलं आहे.
55
सामान्य युजर्सना काळजीचे कारण नाही
व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे की जे युजर्स हे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेणार नाहीत, त्यांच्यासाठी सध्याच्या सर्व मोफत सेवा कोणत्याही बदलाशिवाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. त्यामुळे सामान्य युजर्सना काळजी करण्याची गरज नाही.
Read more Photos on

Recommended Stories