WhatsApp New Features :मेटाच्या मालकीचे, जगातील आघाडीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp, आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट्स आणत आहे. आता ग्रुप चॅट्समधील गोंधळ कमी करण्यासाठी आणि वापर सोपा करण्यासाठी नवीन फीचर्स सादर केली आहेत.
मेटाच्या मालकीचे, जगातील आघाडीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp, आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट्स आणत आहे. आता ग्रुप चॅट्समधील गोंधळ कमी करण्यासाठी आणि वापर सोपा करण्यासाठी नवीन फीचर्स सादर केली आहेत. या नवीन फीचर्समुळे, ग्रुपमध्ये कोणाची काय जबाबदारी आहे हे सहजपणे समजू शकेल. येत्या काही आठवड्यांत हे अपडेट्स सर्व वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले आहे.
25
ग्रुपमधील तुमची ओळख काय? - 'मेंबर टॅग्ज' (Member Tags)
सर्वात आधी 'मेंबर टॅग्ज'बद्दल पाहूया. हे एक खूप उपयुक्त फीचर आहे. आता ग्रुप चॅट्समध्ये तुम्ही तुमच्या नावापुढे एक छोटा टॅग जोडू शकता. यामुळे तुम्ही कोण आहात किंवा त्या ग्रुपमध्ये तुमची भूमिका काय आहे, हे इतरांना सहजपणे समजेल. उदाहरणार्थ, फॅमिली ग्रुपमध्ये 'रवीचा भाऊ', अपार्टमेंट ग्रुपमध्ये 'खजिनदार' (Treasurer) किंवा स्पोर्ट्स ग्रुपमध्ये 'गोलकीपर' असा टॅग तुम्ही तुमच्या नावापुढे लावू शकता. अनोळखी सदस्य असलेल्या मोठ्या ग्रुप्समध्ये हे फीचर खूप उपयुक्त ठरेल.
पुढील मनोरंजक अपडेट आहे 'टेक्स्ट स्टिकर्स'. यामुळे तुमचा चॅटिंगचा अनुभव आणखी मजेशीर होईल. आता तुम्ही स्टिकर सर्च बारमध्ये कोणताही शब्द टाइप केल्यास, WhatsApp लगेच त्याचे स्टिकरमध्ये रूपांतर करेल. तुम्ही तयार केलेले स्टिकर लगेच पाठवू शकता किंवा नंतर वापरण्यासाठी सेव्ह करू शकता. तुमच्या भावना केवळ शब्दांतूनच नव्हे, तर तुमच्या स्टाईलमध्ये स्टिकरमधून व्यक्त करण्यास हे फीचर मदत करेल.
WhatsApp ग्रुप्समध्ये इव्हेंट (Events) प्लॅन करण्याची सुविधा आधीपासूनच आहे. आता त्यात 'इव्हेंट रिमाइंडर' हे अतिरिक्त फीचर जोडले आहे. आता ग्रुपमध्ये इव्हेंट तयार करताना, त्यात आमंत्रित केलेल्या सर्वांसाठी तुम्ही आगाऊ रिमाइंडर (Early Reminders) सेट करू शकता. त्यामुळे, 'अरेरे... विसरलोच!' असे म्हणण्याची वेळ कोणावरही येणार नाही. इव्हेंट पिन करणे, कोण येणार आहे याची खात्री करणे (RSVP) यांसारख्या सुविधा आधीपासूनच आहेत, त्यात आता या रिमाइंडर फीचरची भर पडली आहे.
55
आणखी अनेक फीचर्स लवकरच येणार
गेल्या काही वर्षांपासून WhatsApp ने 2GB फाइल शेअरिंग, HD मीडिया, स्क्रीन शेअरिंग यांसारख्या अनेक सुविधा दिल्या आहेत. आता सादर केलेल्या या फीचर्सनंतर आणखी अनेक नवीन अपडेट्स येणार आहेत. विशेषतः, WhatsApp युझरनेम (Usernames), उत्तम स्टोरेज मॅनेजमेंट, सुरक्षित सेवा आणि ग्रुप चॅटमध्ये सर्वांना एकाच वेळी मेन्शन करण्यासाठी '@all' फीचर लवकरच सादर होण्याची शक्यता आहे.