सोन्याचे दर परत वाढले, आज १० ग्रॅम सोन्यासाठी ती रुपये मोजले?

Published : May 02, 2026, 04:44 PM IST

मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात सुमारे 300 रुपयांची, तर चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले असून, खरेदीपूर्वी ताजे दर तपासण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

PREV
15
सोन्याचे दर परत वाढले, आज १० ग्रॅम सोन्यासाठी ती रुपये मोजले?

मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. सलग बदलणाऱ्या दरांमुळे बाजारात खरेदीदार संभ्रमात दिसत आहेत.

25
किती रुपयांची झाली वाढ?

आज 2 मे रोजी सोन्याच्या दरात सुमारे 300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही तब्बल 7 हजार रुपयांची वाढ झाल्याने मौल्यवान धातूंच्या बाजारात तेजी दिसून आली.

35
सामान्य ग्राहकांचे कोलमडले बजेट

ताज्या दरानुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह सुमारे 1 लाख 53 हजार 780 रुपये मोजावे लागत आहेत. वाढलेल्या दरामुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

45
चांदीचा दर किती?

एक किलो चांदीचा दरही वाढून 2 लाख 58 हजार 530 रुपयांवर पोहोचला आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात या वाढीचा परिणाम खरेदीवर होऊ शकतो.

55
सल्ला काय घेतला?

आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरमधील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे खरेदीपूर्वी ताजे दर तपासून निर्णय घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories