
What The ABS Warning Light In Your Car Means : आधुनिक काळात, सर्व वाहन उत्पादक ग्राहकांसाठी नवनवीन वैशिष्ट्यांसह वाहने बाजारात आणत आहेत. कार्स आता खूप प्रगत झाल्या आहेत. आता गाडीमध्ये लहानसा बिघाड झाला तरी गाडी सिग्नल देऊ लागते. यामुळे कारच्या कोणत्या भागात समस्या आहे हे कळते. तुम्ही कधीतरी डॅशबोर्डवरील ड्रायव्हर डिस्प्लेमध्ये वॉर्निंग लाईट पाहिला असेल. प्रत्येक वॉर्निंग लाईट कशाचा तरी संकेत देतो. या लाईट्सपैकी एक लाईट ABS म्हणजेच अँटी-ब्रेकिंग सिस्टमसाठी असतो. जर ABS लाईट चालू झाला, तर त्याचा अर्थ काय आहे आणि त्यामुळे काय नुकसान होऊ शकते, ते पाहूया.
जेव्हा तुमच्या डॅशबोर्डवर अचानक एखादा अलर्ट लाईट लागतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की कारची सिस्टम तुम्हाला काहीतरी सांगत आहे. गाडी चालवताना किंवा कार सुरू केल्यानंतर ड्रायव्हरच्या डिस्प्लेवर ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) अलर्ट लाईट लागलेला दिसल्यास, तो एक धोक्याचा इशारा असू शकतो. तुम्ही त्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे.
ABS हे एक सेफ्टी फीचर आहे, जे अचानक किंवा वेगात ब्रेक लावल्यावर चाके लॉक होण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे ड्रायव्हरला गाडीवर चांगले स्टिअरिंग नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. हे कारला घसरण्यापासून रोखण्यासही मदत करते. एकूणच, हे फीचर अपघात टाळण्यास मदत करते.
जेव्हा ABS लाईट लागतो, तेव्हा हे सूचित होते की अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम निष्क्रिय झाली आहे किंवा सेन्सरमध्ये काहीतरी गंभीर बिघाड झाला आहे. जर तुम्हाला हा लाईट दिसत असेल, तर तुम्ही तुमचे वाहन त्वरित सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा जवळच्या मेकॅनिककडे घेऊन जावे.
जर ABS लाईट चालू असेल, तर याचा अर्थ सेन्सर योग्यरित्या काम करत नाही किंवा तो खराब झाला आहे. समजा तुम्ही हीच बिघाड झालेली गाडी चालवत आहात. आणि अचानक तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक लावावा लागला. अशा परिस्थितीत अपघाताचा धोका वाढतो. कारण सदोष सेन्सरमुळे चाके जाम होऊ शकतात आणि वाहनावरील नियंत्रण सुटू शकते.