EMI कमी करण्यासाठी काय करायला हवं?

Published : Apr 15, 2025, 03:25 PM IST

EMI चा भार कमी करायचा आहे? बँक लोन रीफायनान्सिंग, पार्ट प्री-पेमेंट आणि क्रेडिट स्कोअर सुधारण्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घ्या EMI कमी करण्यासाठी काय काय करता येईल.

PREV
17
EMI कमी करण्यासाठी काय करायला हवं?

घराचे हप्ते भरताना आपल्याला EMI चे हप्ते भरावे लागतात. हे हप्ते भरताना आपल्याला कमीत कमी इएमआय कसा भरता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष असत. 

27
बँक किंवा कर्जदात्याशी पुन्हा चर्चा करा

कर्जाचे कालावधी वाढवून घ्या – यामुळे EMI कमी होतो. नवीन दराने व्याज दर घ्यायला विचारणा करा – जर सध्याचा दर जास्त असेल तर.

37
कर्जाचे रीफायनान्सिंग

जर दुसऱ्या बँकेत कमी व्याजदराने लोन मिळत असेल तर तिथे ट्रान्सफर करा. यामुळे EMI कमी होऊ शकतो आणि एकूण व्याजातही बचत होऊ शकते.

47
पार्ट प्री-पेमेंट करा

लहान रक्कमही EMI किंवा मुख्य रकमेतून भरल्यास पुढील हप्ते कमी होतात. वार्षिक बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न यासाठी वापरा.

57
इतर कर्ज एकत्र करा

जर अनेक कर्जे असतील, तर त्यांना एकत्र करून एक मोठं कर्ज घ्या (lower interest rate) – यामुळे एकूण EMI कमी होतो.

67
क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा प्रयत्न करा

चांगला CIBIL स्कोअर असेल तर तुम्हाला कमी व्याजदराचं कर्ज मिळू शकतं.

77
बँकेच्या ऑफर तपासा

कधी कधी सणासुदीला बँका EMI waiver schemes, cashback किंवा कमी व्याजदराची ऑफर देतात.

Recommended Stories