शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यात अशी संयुगे देखील आहेत, जी साखरेचे शोषण कमी करतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात.
शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यात साखरेचे शोषण कमी करणारी आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारणारी संयुगे आहेत. अभ्यासानुसार, याचा चयापचयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
29
शेवग्याचे पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत -
शेवग्याचे पाणी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच ते नियमित प्यायल्याने सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांना प्रतिबंध होतो.
39
ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत -
शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड आणि आयसोथियोसायनेट्ससारखी संयुगे असतात. हे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारून आणि कर्बोदकांमचे शोषण कमी करून ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.
49
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठीही शेवग्याचे पाणी उपयुक्त -
अभ्यासानुसार, शेवग्याची पाने LDL ('खराब') कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करून लिपिड प्रोफाइलवर परिणाम करू शकतात, तर HDL ('चांगले') कोलेस्ट्रॉल माफक प्रमाणात वाढवतात. त्यामुळे कालांतराने हृदयाच्या आरोग्यास मदत होऊ शकते.
59
शेवग्याच्या पानात ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करणारे अँटीऑक्सिडंट्स -
फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगांनी समृद्ध असलेल्या शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. हे निरोगी चयापचयासाठी उपयुक्त आहे.
69
चयापचय वाढवून आणि भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत -
शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढतो आणि भूक कमी होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे जंक फूड खाण्याची इच्छा कमी होते.
79
शेवग्याच्या सेवनाने ग्लुकोजची पातळी कमी -
मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी शेवग्याचे पाणी मदत करते. अभ्यासानुसार, जेवणानंतर शेवग्याचे सेवन केल्याने ग्लुकोजची पातळी कमी होते.
89
शेवग्याचे पाणी पचनाच्या समस्या आणि बद्धकोष्ठता टाळते -
यात सौम्य पौष्टिक गुणधर्म आहेत, जे बद्धकोष्ठता टाळू शकतात आणि नियमित मलत्यागास प्रोत्साहन देऊ शकतात.
99
शेवग्याच्या पानांचे पाणी केसांना आतून पोषण -
हे जीवनसत्त्वे, खनिजे (लोह, जस्त), अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो ॲसिडने समृद्ध आहे. हे टाळूचे आरोग्य सुधारते आणि दाट, लांब केसांना प्रोत्साहन देते.