Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत क्रीडा कोट्यातून भरती, एकूण 64 जागांसाठी सुवर्णसंधी!

Published : Aug 03, 2025, 10:33 PM ISTUpdated : Aug 03, 2025, 10:35 PM IST
Railway New Rule

सार

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वे क्रीडा कोट्या अंतर्गत स्पोर्ट्सपर्सन (गट क आणि गट ड) पदांसाठी ६४ रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत www.rrc-wr.com या वेबसाइटवर अर्ज करावेत.

मुंबई : पश्चिम रेल्वे क्रीडा कोटा भरती 2025 अंतर्गत स्पोर्ट्सपर्सन (गट क आणि गट ड) पदांसाठी एकूण 64 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Western Railway Recruitment Cell (RRC WR) मार्फत केली जात असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2025, संध्या. 6 वाजेपर्यंत आहे.

भरती तपशील

भरती करणारी संस्था Western Railway Sports Quota (RRC WR)

जाहिरात क्र. RRC/WR/01/2025 (Sports Quota)

पदाचे नाव Sportsperson – Group C & D (Level 1 ते 5)

एकूण पदसंख्या 64 जागा

पदांचे विभाजन Group C – 21 जागा

Group D – 43 जागा

पगार जाहिरात PDF मध्ये नमूद

नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य

अर्जाची पद्धत ऑनलाइन (Online)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2025

शैक्षणिक पात्रता (पदानुसार)

Level 4 & 5: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी

Level 2 & 3: 12वी उत्तीर्ण + ITI

Level 1: 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा

वयोमर्यादा

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 25 वर्षे (दि. 01 जानेवारी 2026 रोजी)

जन्मतारीख 02/01/2001 ते 01/01/2008 दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया

खेळातील कामगिरीचे मूल्यमापन,

ट्रायल्स,

शैक्षणिक पात्रतेची पडताळणी

फक्त ट्रायल्समध्ये 'FIT' ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यासाठी विचारात घेतले जाईल.

अर्ज शुल्क

General/OBC/EWS ₹500/-

SC/ST/महिला/ExSM/EBC ₹250/-

(शुल्क ऑनलाइन भरायचे आहे.)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरु: 30 जुलै 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 ऑगस्ट 2025 (संध्या. 6 वाजेपर्यंत)

महत्वाची टीप

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा लेखी/ऑनलाइन परीक्षेचा टप्पा नाही, ही संधी खास खेळाडूंसाठी आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उमेदवारांनी संधीचा जरूर लाभ घ्यावा.

अधिकृत वेबसाईट:

https://www.rrc-wr.com/

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

सासूबाईंना अॅडजस्टेबल पैन्जन द्या गिफ्ट, पाहून म्हणतील सुनबाई माझी गुणांची गं!
मोठी बातमी! रेपो रेट घटला! पण तुमचा Home Loan EMI नेमका किती रुपयांनी कमी होणार? ही आकडेवारी तुम्हाला आनंद देईल!