बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी का? मग, हे बी खा...

Published : Dec 21, 2025, 07:32 PM IST
constipation problem

सार

बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून  सुटका हवी असेल तर जवसाचा आहारात समावेश असून  एक चमचा जवसाच्या बियांमध्ये सुमारे 2.8 ग्रॅम फायबर असते. यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. 

आजकाल बऱ्याच लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या दिसून येते. आहारात काही बदल केल्यास शौचास साफ होण्याची  समस्या दूर होण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी आपल्या डाएट प्लॅनमध्ये जवसाच्या बियांचा (Flaxseed) नक्कीच समावेश करावा. बद्धकोष्ठतेपासून आराम देणे हा जवसाच्या बियांचा एक महत्त्वाचा फायदा आहे. 

अभ्यासानुसार, दररोज जवसाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होतात. या बिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करतात. दररोज दोन चमचे जवस पाण्यात भिजवून किंवा चटणीसारख्या पदार्थांमध्ये घालून खाऊ शकता.

न्यूट्रिशन & मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्यांनी 12 आठवडे दररोज 10 ग्रॅम जवसाच्या बियांचे सेवन केले, त्यांच्यामध्ये बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होण्यास मदत झाली. तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये शौचास साफ होण्यास जवसाच्या बिया मदत करतात, असे आढळून आले आहे.

यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते. प्रत्येक चमचा जवसाच्या बियामध्ये सुमारे 2.8 ग्रॅम फायबर असते. यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. विरघळणारे फायबर पाण्यात विरघळून जेलसारखा पदार्थ तयार करतात, ज्यामुळे मल मऊ होते. यामुळे शौचास सहजपणे आणि त्रासाशिवाय होण्यास मदत होते.

जवसाच्या बिया आतड्यांतील मायक्रोबायोम निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यांचे प्रीबायोटिक गुणधर्म आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे पोषण करतात. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, दररोज दोन चमचे जवसाच्या बिया पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्याने केवळ बद्धकोष्ठता दूर होत नाही, तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. जवसाच्या बिया चटणीमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये घालून खाऊ शकता. 

 

 


 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आता अख्खं घर घेऊन फिरा! मोठ्या बूट स्पेसच्या 'या' स्वस्त कार; बॅगा कितीही असू द्या, जागा उरणारच
MJP Job 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी! 290 पदांसाठी भरती, अर्जाला मुदतवाढ