
दात स्वच्छ आणि निरोगी असतीलतर तुमचा आत्मविश्वास वाढतो. अनेक कारणांमुळे दातांचे आरोग्य बिघडू शकते. दातांच्या आरोग्यासाठी दिवसातून दोनदा दात घासा. तसेच, धूम्रपान करणे सोडा. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि दात स्वच्छ व पांढरे ठेवण्यासाठी घरगुती उपाय काय करावे, ते जाणून घेऊया.
1. कडुलिंबाची पाने
अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी युक्त कडुलिंबाची पाने चघळल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि दात पांढरे होण्यास मदत होते.
2. हळद
दररोज हळदीने दात घासल्यानेही दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि दात पांढरे होण्यास मदत होते. यामध्ये असलेले कर्क्युमिन यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी चिमूटभर हळद पावडर पाण्यात किंवा पेस्टमध्ये मिसळून दात घासा.
3. मीठ
मीठ देखील दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत करते. यासाठी टूथपेस्टने दात घासल्यानंतर थोडे मीठ घेऊन दात घासल्यास पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.
4. तुळस
तुळस देखील दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत करते. यासाठी तुळशीची काही पाने उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा. नंतर या पावडरने दात घासा.
5. आंब्याची पाने
आंब्याची पाने वाटून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टने दात घासल्यास दातांवरील डाग दूर होऊन ते पांढरे होण्यास मदत होते.
6. संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीने दात घासल्यानेही दातांवरील पिवळे डाग दूर होण्यास मदत होते.