
प्रत्येकासाठी आपली त्वचा ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सांभाळणे हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकजण बाजारातील महागडी उत्पादनेही खरेदी करतात. मात्र, तरीही त्यांना अपेक्षित असा परिणाम मिळत नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे, हे आपण समजून घेऊयात. अनेकदा तुम्ही त्वचेसाठी खरेदी केलेली उत्पादने ही चुकीच्या क्रमाने वापरत असाल. त्यामुळे कोणते उत्पादन केव्हा वापरावे याची योग्य माहिती नसल्यास, फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, पातळ उत्पादनांपासून जाड उत्पादनांकडे (Thin to Thick) जाणे हे याचे मूळ तत्व आहे. त्यामुळे त्वचेच्या काळजीसाठी पाळायचा योग्य क्रम कोणता हेच आपण जाणून घेऊयात.
सकाळ असो वा रात्र, स्किन केअरमधील पहिली पायरी म्हणजे चेहरा स्वच्छ धुणे. त्वचेवरील घाण आणि तेलकटपणा दूर केल्यावरच इतर उत्पादने त्वचेत खोलवर मुरतात. तुमच्या त्वचेला अनुकूल असलेल्या फेस वॉशने चेहरा धुवा.
चेहरा धुतल्यानंतर त्वचेचा pH स्तर संतुलित ठेवण्यासाठी टोनर वापरला जातो. तळहातावर किंवा कॉटन पॅडवर थोडे टोनर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे त्वचेची छिद्रे स्वच्छ होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी, हायलुरोनिक ॲसिड यांसारखे सीरम वापरणाऱ्यांनी ते टोनरनंतर लावावे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सीरम सर्वात जास्त मदत करतात. ते त्वचेत मुरण्यासाठी थोडा वेळ द्यावा.
डोळ्यांभोवतीची त्वचा खूप संवेदनशील असते. त्यामुळे मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी आय क्रीम लावणे चांगले असते. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरी मॉइश्चरायझर लावणे टाळू नये. आपण आधी लावलेल्या सीरमला त्वचेमध्ये 'लॉक' करण्यास हे मदत करते. यामुळे त्वचा नेहमी ओलसर आणि मुलायम राहते.
जर तुम्ही दिवसा त्वचेची काळजी घेत असाल, तर शेवटची पायरी सनस्क्रीन असली पाहिजे. ऊन असो वा नसो, घरात असतानाही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. हे त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवते. रात्री सनस्क्रीनऐवजी फेस ऑइल किंवा नाईट क्रीम वापरू शकता.
लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी: