
Volkswagen Taigun Facelift Teased With New Features : फॉक्सवॅगनच्या (Volkswagen) लोकप्रिय टायगुन (Taigun) गाडीच्या फेसलिफ्ट मॉडेलचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही मिड-साइज एसयूव्ही 9 एप्रिल 2026 रोजी भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. टीझरमध्ये गाडीची डिझाइन पूर्णपणे स्पष्ट दिसत नसली तरी, तिचा आकार सध्याच्या मॉडेलसारखाच असल्याचं दिसतंय. नवीन फॉक्सवॅगन टायगुन 2026 फेसलिफ्टमध्ये नवीन स्कोडा कुशाकप्रमाणेच (Skoda Kushaq) डिझाइन आणि फीचर्समध्ये बदल अपेक्षित आहेत. तसेच, 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा नवीन पर्यायही यात जोडला जाणार आहे.
याआधी समोर आलेल्या काही स्पाय शॉट्सनुसार, अपडेटेड टायगुनमध्ये एलईडी लाईट बार आणि मध्यभागी चमकणारा फॉक्सवॅगनचा लोगो असलेली थोडी वेगळी फ्रंट ग्रिल असू शकते. तसेच, नवीन डिझाइनचे एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प मिळण्याचीही शक्यता आहे. गाडीला नवीन अलॉय व्हील्ससोबत अपडेटेड फॉग लॅम्प्सही दिले जाऊ शकतात.
माप आणि रंग
मापांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, 2026 फॉक्सवॅगन टायगुनमध्ये कोणताही बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे. या मिड-साइज एसयूव्हीची लांबी 4,221 मिमी, रुंदी 1,760 मिमी आणि उंची 1,612 मिमी आहे. गाडीचा व्हीलबेस 2,651 मिमी आहे. हिचा ग्राउंड क्लिअरन्स 188 मिमी (unladen) असून बूट स्पेस 385 लिटर आहे, जो 1,450 लिटरपर्यंत वाढवता येतो. फॉक्सवॅगन या फेसलिफ्ट मॉडेलला काही नवीन रंगांच्या पर्यायांमध्येही सादर करू शकते.
अधिक फीचर्स
गाडीच्या इंटीरियर लेआउटमध्ये फारसा बदल होणार नाही. पण, नवीन टायगुनमध्ये 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.2-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर आणि मसाज फंक्शन असलेल्या मागील सीट्स मिळण्याची दाट शक्यता आहे.
नवीन पॉवरट्रेनचा पर्याय?
नवीन फॉक्सवॅगन टायगुन 2026 फेसलिफ्ट सध्याच्या 1.0L टर्बो आणि 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह येईल अशी अपेक्षा आहे. 1.0L TSI इंजिन 115bhp ची कमाल पॉवर देते, तर 1.5L TSI युनिट 150bhp पॉवर जनरेट करते. महत्त्वाचा बदल म्हणजे, 1.0L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनला नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल. तर 1.5L टर्बो मोटरसोबत 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय पूर्वीप्रमाणेच मिळत राहील.