विवो V40e 5G स्मार्टफोन केवळ ₹५९९ ला खरेदी करण्याची संधी. फ्लिपकार्टवर या फोनवर मोठी सूट आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध.
Vivo V40e 5G AI Smartphone: सध्या तुम्ही जर विवो कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कमी किमतीत Vivo V40e 5G स्मार्टफोन तुमचा करण्याची संधी आली आहे. काही प्रक्रियांचे पालन केल्यास सुंदर आणि आकर्षक रॉयल ब्रॉन्झ रंगाचा स्मार्टफोन वापरता येईल. फ्लिपकार्ट (Flipkart) डीलनुसार, हा स्मार्टफोन ग्राहक केवळ ५९९ रुपयांना खरेदी करू शकतात. ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने धमाकेदार ऑफर दिली आहे. Vivo V40e 5G स्मार्टफोन ५९९ रुपयांना कसा खरेदी करायचा ते पाहूया.
Vivo V40e 5G स्मार्टफोनची मूळ किंमत ३३,९९९ रुपये असून, सध्या फ्लिपकार्टसह विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर २८,९९९ रुपयांना विक्री होत आहे. याचा अर्थ तुम्हाला थेट ५,००० रुपयांपर्यंतची सूट मिळेल. Vivo V40e 5G स्मार्टफोनमध्ये ८GB रॅम आणि १२८GB ROM स्टोरेज आहे.
इन्स्टंट डिस्काउंटसोबत विवो स्मार्टफोनवर बँक ऑफरही मिळेल. हा स्मार्टफोन Flipkart Axis Bank Credit Card द्वारे खरेदी केल्यास ५% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. एवढेच नाही तर कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि Non EMI वर १,५०० रुपयांची सूट मिळेल. EMI खरेदीदारांना २००० रुपयांची सूट मिळेल. असे केल्याने तुम्ही २८,९९९ रुपयांऐवजी फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. ही बँक ऑफर फ्लिपकार्टकडून दिली जात आहे.
या स्मार्टफोन खरेदीतील आणखी एक खासियत म्हणजे एक्सचेंज ऑफर. Vivo V40e 5G स्मार्टफोनची लिस्टिंग किंमत २८,९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर २८,४०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर ग्राहकांना मिळत आहे. ही एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास Vivo V40e 5G स्मार्टफोन केवळ ५९९ रुपयांना मिळेल.
ही एक्सचेंज ऑफर मिळवण्यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असावा. फोनवर कोणतेही स्क्रॅच आणि नुकसान नसावे. फोनची स्थिती तपासल्यानंतरच त्याची किंमत तज्ज्ञ ठरवतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुमच्या जुन्या फोनची किंमत कमी करून Vivo V40e 5G ची किंमत ठरवली जाते. तुमचा जुना स्मार्टफोन खराब झाला असला तरी ५,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल.
Vivo V40e 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
हा स्मार्टफोन ६.७७ इंचा FHD+ AMOLED डिस्प्ले, १२०Hz रिफ्रेश रेटसह येतो. ८० वॅट चार्जिंगसह ५५००mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी ५०MP प्रायमरी कॅमेरा आणि ८MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ५०MP कॅमेरा दिला आहे. MediaTek Dimensity ७३०० प्रोसेसर, ८GB रॅम आणि २५६GB स्टोरेजसह मिळेल.