Virat Kohli: इंदूर वनडेमध्ये विराट कोहलीने आपल्या ५४व्या शतकासह विक्रमांचा पाऊस पाडला. कोहलीने शतक झळकावले असले तरी, न्यूझीलंडकडून भारताचा ४१ धावांनी पराभव झाला आणि भारताने मालिका १-२ ने गमावली.
इंदूरमध्ये विराट कोहलीचे विश्वरूप, विक्रमांनंतरही टीम इंडियाचा पराभव
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला. त्याने ५४वे शतक झळकावले. पण त्याच्या एकाकी झुंजीनंतरही भारत जिंकू शकला नाही.
26
विक्रमांचा बादशाह विराट कोहली, पाँटिंगचा विक्रम मोडला
या सामन्यात शतक झळकावून कोहलीने अनेक विक्रम केले. न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू ठरला. त्याने रिकी पाँटिंग (६) आणि वीरेंद्र सेहवाग (६) यांना मागे टाकले.
36
रन मशीन कोहलीची एकाकी झुंज
३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची टॉप ऑर्डर अपयशी ठरली, पण कोहली टिकून राहिला. त्याने ९१ चेंडूत शतक पूर्ण केले. पण त्याला इतरांची साथ न मिळाल्याने भारत हरला.
न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद ३३७ धावा केल्या. डॅरिल मिचेल (१३७) आणि ग्लेन फिलिप्स (१०६) यांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनी २१९ धावांची भागीदारी केली.
56
भारताची टॉप ऑर्डर कोसळली
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित (११), गिल (२३), श्रेयस (३) आणि राहुल (१) स्वस्तात बाद झाले. कोहलीने एक बाजू सांभाळली, पण ते पुरेसे नव्हते.
66
भारतात किवींचा ऐतिहासिक विजय
१९८९ पासून न्यूझीलंड संघ भारतात वनडे मालिका खेळत आहे, पण त्यांना कधीही मालिका जिंकता आली नव्हती. मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखालील संघाने हा ऐतिहासिक विजय नोंदवला.