Vehicle Tips: तुमच्या डिझेल कारमध्ये चुकून पेट्रोल भरले गेले तर घाबरून जाऊ नका. इंजिन सुरू न करता तात्काळ पुढील काही गोष्टी अमलात आणा. त्यामुळे होणारे तुमचे लाखो रुपयांचे नुकसान टाळता येऊ शकते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात.
पेट्रोल पंपावरील छोटासा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. डिझेल कारमध्ये पेट्रोल भरणे ही मोठी चूक आहे. कारण डिझेल इंजिन कॉम्प्रेशनवर, तर पेट्रोल इंजिन स्पार्कवर चालते.
26
डिझेल कारमध्ये पेट्रोल टाकल्यास काय करावे?
डिझेल कारमध्ये पेट्रोल टाकल्यावर लगेच इंजिन सुरू करणे ही मोठी चूक आहे. इग्निशन ऑन केल्यास पेट्रोल सर्वत्र पसरते. चूक लक्षात येताच गाडी सुरू न करता जागेवरच थांबवा.
36
कार ढकलून बाजूला घ्या
पेट्रोल पंपावर तुमच्या हे लक्षात आल्यास, गाडी बाजूला ढकलणे उत्तम. काही लोक एवढंच तर आहे असं समजून गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात, पण ही एक मोठी चूक ठरू शकते, ज्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते.
अशावेळी स्वतः प्रयोग करू नका. गाडी थांबवून व्यावसायिक मदत घ्या. रोडसाइड असिस्टन्स किंवा टोइंग सेवेने गाडी सर्व्हिस सेंटरला न्या. उशीर केल्याने समस्या वाढू शकते.
56
दुर्लक्ष करू नका
सर्व्हिस सेंटरमध्ये आधी टाकी रिकामी केली जाते. इंधन लाइन्स आणि फिल्टर्ससोबत टाकी डिझेलने फ्लश करतात. यामुळे पेट्रोलचे कण निघून जातात. याकडे दुर्लक्ष केल्यास इंजिनमध्ये समस्या येते.
66
इंधन प्रणाली स्वच्छ करा
इंधन प्रणाली स्वच्छ झाल्यावर फिल्टर, पंप आणि इंजेक्टर तपासले जातात. गरज असल्यास काही भाग बदलले जातात. सर्व ठीक झाल्यावरच नवीन डिझेल भरून गाडी सुरू करतात. या उपायांनी मोठे नुकसान टळते.