Vastu Tips: खूप कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाहीये का? कमावलेले सर्व पैसे कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत आहेत, असं वाटतंय का? तर, फक्त या सोप्या टिप्स फॉलो करा.
घरात पैसा टिकत नाही आणि खर्च वाढतोय का? याला वास्तूदोषही कारणीभूत असू शकतो. वास्तूशास्त्रानुसार, पैसे ठेवण्याची दिशा आणि जागा आपल्या आर्थिक स्थितीवर परिणाम करते. संपत्ती वाढीसाठी हे नियम पाळा.
23
घरात लॉकर कुठे ठेवू नये?
लॉकर चुकीच्या जागी ठेवल्यास आर्थिक समस्या येतात. टॉयलेटजवळ, ईशान्य कोपऱ्यात किंवा अस्वच्छ, अंधाऱ्या जागी लॉकर ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात लक्ष्मी टिकत नाही.
33
कपाट किंवा तिजोरी कुठे ठेवावी?
वास्तुशास्त्रानुसार, कपाट नैऋत्य दिशेला ठेवावे आणि त्याचे दार उत्तरेकडे उघडावे. लॉकर रिकामा ठेवू नये, स्वच्छ ठेवावा आणि जवळ झाडू नसावा. लाल कापडात पैसे ठेवल्यास लक्ष्मीची कृपा होते.