Utility tips : स्मार्टफोन पाण्यात पडल तरी चिंता करू नका. अशा वेळी त्वरित करायच्या सोप्या पद्धती पाहूया. यामुळे तुमच्या फोनचे मोठे नुकसान होणार नाही आणि अनावश्यक खर्च टाळता येईल.
आजच्या काळात स्मार्टफोन हा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे तो पाण्यात पडल्यास मोठी समस्या होऊ शकते. असे झाल्यास लगेच फोन बंद करा आणि सर्व केबल्स काढा. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका टळतो आणि फोन वाचू शकतो.
22
भिजलेला फोन दुरुस्त करणे
फोन मऊ कापडाने पुसा. हेअर ड्रायर वापरू नका, उष्णतेने नुकसान होते. फोन हवेशीर ठिकाणी सुकवा. तांदळात ठेवल्याने ओलावा शोषला जातो, पण तो तात्पुरता उपाय आहे. 24-48 तास चार्ज करू नका.