चांदीचे पैंजण आणि जोडवी वापरल्यामुळे अनेकदा काळी पडतात. घाम, ओलावा आणि हवेमुळे चांदीवर ऑक्सिडेशनचा थर जमा होतो, ज्यामुळे तिची चमक नाहीशी होते. बहुतेक लोक ते स्वच्छ करण्यासाठी केमिकल किंवा बेकिंग सोडा वापरतात, पण या गोष्टी चांदीला हळूहळू नुकसान पोहोचवू शकतात. जर तुम्हाला केमिकलशिवाय, सुरक्षित आणि घरगुती पद्धतीने तुमचे चांदीचे दागिने पुन्हा चमकवायचे असतील, तर हे 4 सोपे उपाय खूप प्रभावी आहेत.