Skin care : चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी या पाच बियांचा वापर करून पाहा

Published : Dec 21, 2025, 02:49 PM IST
Skin care

सार

शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच त्वचेची निगा राखली जाते. पण त्याचबरोबर,  फॅटी ॲसिड भरपूर असल्याने ओमेगा-3 युक्त जवस मुरुमे असलेल्या तसेच त्वचा लालसर आणि सूज असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. जवसाच्या बिया सलाड किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता.

सध्याचा प्रदूषणाचा स्तरर पाहता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरते. बदलत्या जीवनशैलीचाही परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररजो योग, व्यायाम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्वचेचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रदूषणाचा परिणाम त्यावरही होत असतो. त्वचेची निगा राखण्यासाठी बाजारात क्रीम, तेल, लोशन उपलब्ध आहेत, त्यातही काही रसायनांच्या मदतीने बनवलेली तर काही आयुर्वेदिक. तथापि, काही बिया देखील तेवढ्याच उपयुक्त आहेत. अनेक बिया त्वचेच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्वचेसाठी पाच वेगवेगळ्या बियांचे आवश्यक फायदे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी सांगितले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी त्वचेच्या आरोग्यासाठी बियांचे महत्त्व सांगितले आहे.

जवसाच्या बिया

ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर असल्याने, जवस हे मुरुमे असलेल्या आणि त्वचा लालसर तसेच सुूज असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. जवसाच्या बिया सलाड किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता.

चिया बिया

अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेल्या चिया बिया निस्तेज त्वचा आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत करतात. चिया बिया पाण्यात किंवा सलाडमध्ये घालून सेवन करता येतात.

भोपळ्याच्या बिया

झिंक भरपूर असलेल्या भोपळ्याच्या बिया तेलकट विशेषतः त्वचेसाठी उपयुक्त आहेत. इतकेच नाही तर, कोंडा कमी करण्यासाठीही त्या मदत करतात.

सूर्यफुलाच्या बिया

व्हिटॅमिन ई भरपूर असलेल्या सूर्यफुलाच्या बिया त्वचेचा नैसर्गिक थर संरक्षित करण्यास आणि नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात.

तीळ

लिग्नॅन्स आणि सेलेनियम असलेले तीळ त्वचा सुंदर बनवण्यासाठी आणि तिची लवचिकता सुधारण्यासाठी चांगले आहेत.

डॉ. जुश्या भाटिया सांगतात की, जवसाच्या बियांपासून ते सूर्यफुलाच्या बियांपर्यंत, सर्व ओमेगा-३, झिंक, सेलेनियम आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत - हे सर्व घटक त्वचेला चमकदार बनवतात. तथापि, आहारात मूठभर बिया समाविष्ट करण्यापूर्वी त्यांचे फायदे आणि तोटे जाणून घेण्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्या देतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Diabetes Tips : मधुमेहाची चिंता, आहारात करा हे 6 बदल अन् पहा फायदा
Hair Tips : केसांचं नुकसान होतंय?, नेमकं काय करावं सुचत नाहीए?, तर मग स्टायलिंग करताना घ्या 'ही' काळजी