UPI Budget Usage : UPI वर एक क्लिक आणि खिसा रिकामा... तुम्हालाही आहे का ही सवय?

Published : Oct 05, 2026, 04:50 PM IST

UPI Budget Usage : UPI वरून होणारे छोटे-छोटे खर्च तुमचं महिन्याचं बजेट कसं बिघडवतात? अनावश्यक UPI खर्चावर नियंत्रण ठेवून पैसे वाचवण्यासाठी या सोप्या बजेट टिप्स…

PREV
18
बजेट बिघडवणारा UPI

खिशात पैसे आहेत का? याचा विचार न करता आपण थेट QR कोड शोधायला लागतो. UPI ने आपलं आयुष्य इतकं सोपं केलं आहे. चहाच्या टपरीपासून ते सुपर मार्केटपर्यंत, २० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतचं पेमेंट आता काही सेकंदात होतं. खिशात रोख रक्कम नसली तरी चालते, या सुविधेने आपला शॉपिंगचा अनुभवच बदलून टाकला आहे.

पण हीच सुविधा कधीकधी बजेटची सर्वात मोठी शत्रू बनू शकते. 'फक्त ५० रुपये तर आहेत', 'हा तर छोटासा खर्च आहे' असा विचार करून आपण UPI वरून सतत छोटे-छोटे व्यवहार करतो. पण महिन्याच्या शेवटी याच छोट्या खर्चाची मिळून एक मोठी रक्कम तयार होते.

विशेषतः अनावश्यक ऑनलाइन ऑर्डर्स, फूड डिलिव्हरी आणि अचानक केलेली शॉपिंग यांसारख्या गोष्टींमध्ये UPI च्या वेगामुळे विचार न करता खर्च करण्याची सवय लागू शकते.

28
UPI मुळे जास्त खर्च का होतो?

खिशात रोख रक्कम असली की प्रत्येक रुपया खर्च करण्यापूर्वी आपण एकदा तरी विचार करतो. पण तेच पैसे जेव्हा आपण UPI द्वारे देतो, तेव्हा तो संकोच अनेकदा गायब होतो.

हातात ५०० रुपयांची नोट असेल आणि ती देऊन एखादी वस्तू घ्यायची असेल, तर 'ही खरंच घ्यायची गरज आहे का? नोट मोडायची का? सुट्टे पैसे आले की खर्च होतील' असा विचार आपण करतो. पण UPI वरून १००, २०० रुपये देताना पैसे हातातून गेल्याची जाणीवच होत नाही.

काही सेकंदात पेमेंट होतं आणि 'Payment Successful' असा मेसेजही येतो. यामुळे पैसे खर्च होत आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. नकळतपणे UPI वरून जास्त खर्च होण्यामागचं हे एक मुख्य कारण आहे.

38
छोटा खर्च, मोठी समस्या

छोटासा खर्च आहे, असं समजून जर तुम्ही UPI वरून सतत पेमेंट करत राहिलात, तर महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम खर्च झाल्याचं पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो.

उदाहरणार्थ, एका दिवसात तुम्ही खालीलप्रमाणे खर्च केला:

  • सकाळची कॉफी - ४० रुपये
  • स्नॅक्स - ५० रुपये
  • ऑनलाइन डिलिव्हरी - १०० रुपये
  • अनावश्यक छोटी शॉपिंग - १५० रुपये

हा एकूण खर्च फक्त ३४० रुपये वाटतो. पण जर हाच खर्च रोज होत राहिला, तर ३० दिवसांत तुमचे तब्बल १०,२०० रुपये खर्च होतील.

48
UPI खर्चावर नियंत्रण कसं मिळवायचं?

UPI मुळे खिशात पैसे नसतानाही सहज खर्च करता येतो. त्यामुळे 'याची खरंच गरज आहे का?' असा विचार करण्याआधीच पैसे खर्च होऊन जातात. हे टाळण्यासाठी, तुमच्या उत्पन्नानुसार आणि महिन्याच्या बजेटनुसार दररोजची किंवा आठवड्याची UPI खर्चाची मर्यादा (Limit) ठरवा.

उदाहरणार्थ, अनावश्यक छोट्या खर्चासाठी आठवड्याला फक्त १,००० रुपयांची मर्यादा निश्चित करा. ती रक्कम संपली की, पुढच्या आठवड्यापर्यंत अनावश्यक UPI खर्च टाळा. अशा छोट्याशा नियंत्रणामुळे महिन्याच्या शेवटी होणारा अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.

58
तुमची UPI पेमेंट हिस्ट्री तपासा

आठवड्यातून एकदा तुमची UPI पेमेंट हिस्ट्री (UPI Payment History) उघडून नक्की पाहा. गेल्या ७ दिवसांत कॉफी, स्नॅक्स, ऑनलाइन डिलिव्हरी आणि छोट्या शॉपिंगसाठी आपण कुठे कुठे पैसे दिले आहेत, हे पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या खर्चाच्या सवयी समजायला मदत होईल.

प्रत्येक व्यवहार वेगळा पाहिला की ती रक्कम छोटीच वाटते. पण जेव्हा तुम्ही हे सगळे खर्च एकत्र पाहता, तेव्हा 'अरेच्चा! या सगळ्यासाठी मी इतके पैसे खर्च केलेत?' असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

जर तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचं असेल, तर सर्वात आधी तुमचे पैसे नेमके कुठे जात आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे.

68
खरेदी करण्यापूर्वी १० मिनिटे विचार करा

एखादी वस्तू दिसली की ती लगेच विकत घेण्याची सवय थोडी बदलून पाहा. जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यावीशी वाटली, तर UPI ने लगेच पेमेंट करण्याऐवजी किमान १० मिनिटे थांबा.

त्या १० मिनिटांत स्वतःला विचारा, 'मला खरंच याची गरज आहे का? अशीच एखादी वस्तू आधीपासून घरात आहे का? आता ही वस्तू नाही घेतली तर माझं काही अडणार आहे का?'

१० मिनिटांनंतरही जर तुम्हाला ती वस्तू आवश्यक वाटली, तरच ती विकत घ्या. नाहीतर हा अनावश्यक खर्च टळेल आणि तुमचे पैसे वाचतील.

78
ऑफर्स पाहून खरेदी करू नका

विशेषतः UPI पेमेंट करताना, ऑफर्स (Offer) मिळत आहेत या विचाराने आपण अनेकदा अनावश्यक वस्तूही विकत घेतो.

एखादी वस्तू विकत घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, 'जर ही ऑफर नसती, तरीही मी ही वस्तू घेतली असती का?' जर तुमचं उत्तर 'नाही' असेल, तर ती वस्तू तुम्हाला खरंच नको आहे, हे समजून जा.

त्यामुळे कॅशबॅक (Cashback), डिस्काउंट (Discount) आणि कूपन (Coupon) यांसारख्या शब्दांना भुलून जाऊ नका. 'पहिली गरज आणि मग किंमत' हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा.

88
महिन्याच्या बजेटमध्ये UPI खर्चासाठी वेगळी जागा ठेवा

घरभाडं, किराणा आणि EMI यांसारख्या मोठ्या खर्चाचाच फक्त हिशोब ठेवला, तर बजेट पूर्ण होत नाही.

त्यामुळे महिन्याचं बजेट ठरवताना नाश्ता, कॉफी, फूड डिलिव्हरी, ऑनलाइन शॉपिंग आणि प्रवासाचा छोटा खर्च यांसारख्या UPI खर्चासाठीही वेगळी रक्कम बाजूला काढून ठेवा.

बजेटमधील आवश्यक खर्च कोणता आणि अनावश्यक खर्च कोणता, हे ओळखणं हीच पैसे वाचवण्याची पहिली पायरी आहे.

समस्या UPI मध्ये नाही, तर ते वापरण्याच्या पद्धतीत आहे. प्रत्येक पेमेंट करण्यापूर्वी 'ही खरंच गरज आहे की फक्त इच्छा?' असा प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय लावली, तर अनावश्यक खर्च नक्कीच कमी होईल.

UPI पेमेंटसाठी फक्त एक क्लिक पुरेसं असतं. पण त्या एका क्लिकमुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार नाही, याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे.

Read more Photos on

Recommended Stories